मुल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विज पुरवठा सुरळीत सुरु ठेवा – शिवसेनेची मागणी
मुल तालुक्यात रोवणी झाली असून सिंचनाची सोय असलेल्या शहरी व ग्रामीण शेतकऱ्यांना मोटार पंप द्वारे पाण्याचा उपसाकरून आपली शेती वाचवीण्याचा प्रयत्न करणे सुरु केले आहे. मात्र तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात विजेचा लपंडाव सुरु असून वारंवार वीज खंडित होत असल्याने पाणी उपसा करणे शक्य होत नाही. त्यामुळे तालुक्यातील विजेचा पुरवठा सुरळीत करावा तसेच अशी मागणी मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी उप कार्यकारी अभियंता श्री.चौरसिया यांच्याकडे निवेद्नद्वारे केली .
देशावर कोरोनाचे भयंकर संकट आले आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशात ३ महिने लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे मुख्यत: शेतीवर अवलंबून असणारे शेतकरी वर्ग आणि मोलमजुरी करून उपजीविका करणारे मजूर वर्ग यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांच्याकडून टप्या_ टप्या_ ने वीजबील भरतील ते स्वीकारावे अशी मागणी करण्यात आली त्यावर महावितरण कंपनीचे शहरी व ग्रामीन भागातील अभियंता श्री.मनोज रणदिवे,श्री.पंकज उज्वने , श्री. कृपाल लान्जे याच्या ही बाब लक्षात आणुन दिली त्यावर मुल तालुक्यातील सर्व क.अभियंता यानी हमी दिली की वीजबीलाची भरणा करण्याची सक्ती केली जाणार नाही. आता नुकताच शेतीच्या पिकाला अंकुरित व्यायची वेळ झाली झाली आहे पण तशातच वरूणराजाची अवकृपा तालुक्यावर झाली असल्याने काहीसा शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. पाऊस पडत नसल्यामुळे कसेबसे देवावर भरवसा ठेवून शेतकरी पंपाच्या सहाय्याने पाणी करून शेतीचे रोवणे केले आहेत आणि आता दिवसातून पाच ते सहा वेळा वीज जात असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव बंद करून विजेचा पुरवठा पूर्णपणे अखंडित सुरळीत करा अशी मागणी मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी मुल विद्युत विभागाला केली आहे या शिष्टमंडळात मा.ता.प्र.सुनिल काळे, संदीप चिताडे,शंकर पाटेवार, कपिल येलगेलवार,राहुल महाजनवार, अरविंद करपे, अंकुर कड्यालवार, आकाश तोटावार व अन्य शिवसैनिक हजर होते.
