नवरात्री निमित्त्याने बुलठाण्यात पार पडला नारीशक्तींचा सत्कार !

0
358

नवरात्री निमित्त्याने बुलठाण्यात पार पडला नारीशक्तींचा सत्कार !

किरण घाटे

बुलठाणा । येथील स्थानिक आमदार श्वेता ताई महाले यांच्या संकल्पनेतून नवरात्री उत्सवात विविध नारी शक्तींचा सन्मान करण्याचा उपक्रम सध्या सुरू आहे. त्याच निमित्ताने दि. 20 ऑक्टोबरला (बुलठाणा येथील रामनगर निवासस्थानी) भूतपुर्व आमदार विजयराज शिंदे व अर्पिता शिंदे या दांपत्या कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय व माेलांची कामगिरी करणांऱ्या नारीशक्तींचा सत्कार आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते थाटात पार पडला.
सेवा संकल्प परिवारात पालवे दाम्पत्य समवेत निराधार मानसिक रुग्ण अपंग यांची सेवा करून साहित्य क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल प्रा.वंदना निशिकांत ढवळे [महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल ग्रुपच्या मार्गदर्शिका] यांचा साडी-चोळी देवून या वेळी सत्कार करण्यात आला
बचत गटाच्या माध्यमातून महिला स-शक्तिकरण करणाऱ्या प्रतिभा संजय आराख पांडे तसेच आयुर्वेद उत्पादन महिला बचत गटात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या रेणुका भालेराव यांचा देखिल या कार्यक्रमात सत्कार करण्यांत आला. विशेष उल्लेखनिय बाब अशी की हातेडी गावच्या पंचफुला छगन सुर्वे या महिलेने स्वतः बारा वर्षे ऑटो रिक्षा चालवून आपल्या तीन मुलींचे लग्न केले व एका मुलाला एक सैनिक म्हणून देशसेवेत पाठविले.एव्हढेच नाहीतर आजारी असलेल्या पतीचा चार वर्षे वैद्यकीय इलाज करून तीने ख-या अर्थाने नारी शक्तीचा (या कार्यक्रमातील उपस्थितीतांना) पुरुषप्रधान संस्कृतीला विशेष परिचय करून दिला .सदरहु कर्तबगार महिलेचा भावनिक सत्कार साडीचोळी देऊन करण्यात आला .एकूण नऊ नारी शक्तींचा सत्कार व सन्मान या निमित्ताने या ठिकाणी प्रत्यक्ष डाेळ्यांनी बघावयास मिळाला .सदरहु आयाेजित सत्कार कार्यक्रमाला भाजपाच्या विजया राठी, अलका पाठक , कांताताई राजगुरू यांच्यासह शहरातील अनेक महिला, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप उगले व शहराध्‍यक्ष विनायक भाग्यवंत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here