हायमास्ट लाईटच्या प्रकाशात लखलखनार घुग्घुस शहर

0
425

हायमास्ट लाईटच्या प्रकाशात लखलखनार घुग्घुस शहर

घुग्घुस शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे अंतिम लक्ष – देवराव भोंगळे

घुग्घुस शहर लवकरच हायमास्ट लाईटच्या प्रकाशात लखलखनार आहे. हायमास्ट लाईट मंजुर करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पाठपुरावा केला होता.

त्या अनुषंगाने रामनगर मुख्य चौक, शिवनगर मुख्य चौक, सुभाषनगर हनुमान मंदिर, चांद शाहावली दर्गा जवळ, पोळा मैदान जवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती परिसर, गजानन महाराज मंदिर परिसर, साई नगर हनुमान मंदिर, सीएनआय चर्च परिसर, बिलीवर्स चर्च परिसर, श्रीकृष्ण नगर ओपन स्पेस परिसरात हायमास्ट लाईट मंजूर करण्यात आले आहे.

तर प्रस्तावित हायमास्ट लाईट शिव मंदिर इंदिरा नगर, इमामवाडा परिसर, विनोद शेंडे यांच्या घरासमोरील ओपन स्पेस, गणपती मंदिर ड्रीमलँड सिटी, राधाकृष्ण मंदिर शास्त्रीनगर, पोषम्मा माता मंदिर शिवनगर रोड, पंचशील चौक परिसर, प्रभाग क्र.२ मुन्नेरुकाप्पू समाज भवन छोटू ढवस यांच्या घरासमोरील ओपन स्पेस, हनीफ शेख यांच्या घरासमोरील ओपन स्पेस, सिद्धार्थ बुद्ध विहार केमिकल नगर, असगर खान यांच्या घरा समोरील ओपन स्पेस, प्रा. क्र.२ वावरे व झाडे यांच्या घरासमोरील ओपन स्पेस, हनुमान मंदिर चित्रीव यांच्या घरासमोरील ओपन स्पेस, बाबुलाल पान सेंटर अमराई परिसर, नवयुवक दुर्गा माता मंडळ परिसर, मादगी समाज भवन, शालोम गोस्पल चर्च, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह अमराई, आम्रपाली बुद्ध विहार अमराई, सारिपूत्त बुद्ध विहार सुभाष नगर, महाप्रज्ञा बुद्ध विहार इंदिरा नगर, मिलिंद वाचनालय तुकडोजी नगर येथे हायमास्ट लाईट लावण्यात येणार आहे.

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी हायमास्ट लाईट लावण्यात येणाऱ्या ठिकाणाची भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पाहणी केली.

घुग्घुस शहर हायमास्ट लाईटच्या प्रकाशात लखलखनार असल्याने शहर वासियांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here