काँग्रेसच्या निवेदनाची दखल घेत महावितरणाने विद्युत लाईन शेजारील झाडांची केली सफाई
घुग्घूस : शहरात विजेच्या लंपडावाने नागरिक त्रस्त झाले व लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार थोड्याश्या वादळ वाऱ्याने व पावसाने ही वीज चालली जाते.

या समस्या त्वरित सोडवण्यासाठी महावितरणाने विद्युत लाईन जवळील झाडांच्या फांद्याची छाटणी करावी कमकुवत असलेली वीज जोडणी तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच नवीन सयंत्र ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावे व विजेची वारंवार होणारी गळती थांबविण्या करिता उपाययोजना करण्या संदर्भात काँग्रेस तर्फे शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी निवेदन दिले.
या निवेदणाची दखल घेत महावितरणाने पावसाळा पूर्व जोरदार तैयारी सुरू केली असून सदर कामा करिता बुधवारी वीज पुरवठा बंद ठेवीत दुरुस्ती कार्याला प्राधान्य दिले आहेत.