महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांचा उद्योजकीय विकास व्हावा – आ. किशोर जोरगेवार

0
281

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांचा उद्योजकीय विकास व्हावा – आ. किशोर जोरगेवार

जिल्हास्तरीय महिला बचत गट प्रदर्शनीचे आमदार जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन, महिला आर्थिक विकास महामंडळ चे आयोजन

महिला आर्थिक विकास महामंडळ ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी, त्यांना सक्षम करणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. महिलांमध्ये आत्मविश्‍वास वाढवून त्यांचा उद्योजकीय विकास घडवून आणणे, त्यांना सातत्याने रोजगाराच्या संधी आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळच्या वतीने केल्या जात असून महिलांनीही याचा लाभ घेत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकीय विकास करावा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
राजीव गांधी सभागृह येथे महिला आर्थिक विकास महामंडळच्या वतीने जिल्हास्तरीय महिला बचत गट प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी रुपेश शेंडे, लेखाअधिकारी नरेंद्र बनकर, बीआरटीसीच्या पर्यवेक्षक योगीता साठवणे, रिमा खंडाळकर, शालिनी कांबळे, अंजु सोयाम, सुनिता गणफाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या प्रसंगी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, महिलांमध्ये कल्पकता असते. जागतिक दर्जाच्या वस्तु आपण या प्रदर्शनीमध्ये ठेवल्या आहेत. या वस्तुंच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठही महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात यावे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम आपल्या वतीने राबविण्यात येत आहे. चंद्रपूर शहरातही आपण असे उपक्रम सुरु करावेत यासाठी निधी आम्ही उपलब्ध करुन देऊ असेही यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. आज देश प्रगती करत आहे. मोठ मोठे कारखाने उभे झाले आहे. मात्र आजही हस्तकलेल्या माध्यमातून स्वनिर्मीत वस्तुंची मोठी मागणी असल्याचे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.
महिला सशक्तीकरण करण्याचे आमचेही प्रयत्न सुरु आहे. निराधार 100 महिलांना ग्रिन ऑटो उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आम्ही करत आहोत. तर अम्मा की दुकान या उपक्रमाच्या माध्यमातून आपण महिला व दिव्यागांना अम्मा की दुकाना उपलब्ध करुन देत असल्याचे ते यावेळी म्हणाले. तर महिलांना स्वयं रोजगारातुन आर्थिक प्रगती करता यावी या करिता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिलांना नि:शुल्क शिवणकाम प्रशिक्षण दिल्या जात असल्याचे यावेळी ते म्हणाले. ऑक्टोंबर महिण्याच्या 19 तारखेपासून आपण माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करत आहोत. या आयोजनात आपण आपला सामृग्री विक्रीचा स्टॉल लावण्याची विनंतीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here