बरांज कोळसा खाणीचे काम सुरु होण्याआधी प्रश्न मार्गी लावा : खासदार बाळू धानोरकर

0
470

बरांज कोळसा खाणीचे काम सुरु होण्याआधी प्रश्न मार्गी लावा : खासदार बाळू धानोरकर

प्रकल्पबाधित गावकऱ्यांच्या व कामगाराच्या मागण्याचे निराकरण करण्याच्या जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना सूचना

राजु झाडे

चंद्रपूर : बरांज कोळसा खाण दि. ३१ मार्च २०१५ पासून बंद होती. ती आता प्रत्यक्ष स्वरूपात सुरु होण्याच्या हालचाली खाण परिसरात सुरु आहे. हि खाण केंद्र सरकारच्या खाण आवंटन सन २००३ व ३१ मार्च २०१५ च्या आदेशानुसार या खाणीच्या मूळ मालक कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड हा आहे. कर्नाटक कार्पोरेशन लिमिटेड या कंपनी कडून अजून पर्यंत तेथील प्रकल्पबाधित गावातील गावकऱ्यांच्या व खाणीतील कामगारांच्या समस्या आजपर्यंत तश्याच आहे. त्या त्वरित सोडविण्याचा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्या.

यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अधिकारी प्रतिनिधी विनोद मत्ते, कामगार प्रतिनिधी राजू डोंगे यांची उपस्थिती होती.
कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ला २००३ व ३१ मार्च २०१५ नुसार सदर ब्लॉक अवंटीत केल्यामुळे प्रकल्पबाधित गाव बरांज मोकासा व चेक बरांज मानोरा या दोन्ही गावांचे पुन्हा सर्व्हे करून ग्रा. पं. रेकॉर्ड नुसार गावाचे खाण सुरु करण्याआधी पुनर्वसन कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी तर्फे करण्यात यावा, बारांज खुली कोळसा खाणीतील आधीच्या प्रकल्पग्रस्त कामगारांना व इतर कामगारांना कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, बारांज खुली कोळसा खाण दिनांक ३१ मार्च २०१५ पासून बंद आहे. त्यामुळे तेथील कामगार हा पूर्णपणे बेरोजगार झालेला आहे. तरी कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने अजूनपर्यंत कामगारांचे १ एप्रिल २०१५ पासून थकीत वेतन दिलेले नाही. यामुळे कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड नि खाण सुरु करण्याच्या आधी त्वरित थकीत वेतन कामगारांच्या खात्यामध्ये जमा करावा हि सर्व प्रश्न त्वरित सोडविण्याचा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here