धम्ममय…बल्लारपूर शहर

0
308

🔸धम्ममय…बल्लारपूर शहर🔸
सध्या बल्लारपूर शहरात सगळीकडे एकच चर्चा आहे की भारतीय बौद्ध महासभेच्या धम्म उपासीका शिबिरात जाऊन धममाचे प्रशिक्षण घेणे….. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर पश्चिम अंतर्गत बल्लारपूर शहर आणि तालुक्याच्या विद्यमाने बल्लारपूर शहरात दिनांक 16 ते 23 एप्रिल 2023 पासून पाच बुद्ध विहारांमध्ये बौद्ध धम्माच्या प्रशिक्षणाचे “धम्म उपासिका प्रशिक्षण शिबीर” आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये बल्लारपूर शहरातील लहान बालका पासून तर वयाचे 85 वर्ष पर्यंत चे सर्व धम्म बांधव खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्माचे प्रशिक्षण घेत आहेत. या सर्व शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत आणि संपूर्ण बल्लारपूर शहर धम्ममय झालेलं आहे. मागील फेब्रुवारी महिन्यात भारतीय बौद्ध महासभेचा 37 श्रामनेर भिक्खू संघ ला बल्लारपूर शहरात भोजनाची निमंत्रण देऊन चार ते पाच बुद्ध विहारांना भेटी दिल्यात आणि धम्माच्या प्रसाराचे कार्य केलेत तसेच समता सैनिक दलाचे खूप मोठ्या प्रमाणात बल्लारपूर शहरात बांधणी केलेली आहे आणि येणाऱ्या वर्षावास च्या आगोदर आठ ते दहा बुद्ध विहारांमध्ये लहान मुला-मुली करता “बाल धम्म संस्कार शिबिर” तसेच महिलांचे शिबिर राबविण्याचा मानस बल्लारपूर शहराच्या अध्यक्ष आयु.नी गायत्री ताई रामटेके आणि अँड. रमण पुणेकर तालुका अध्यक्ष यांनी केला आहे.
बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता संपूर्ण भारतभर बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या माध्यमातून 24 प्रकारचे शिबिर राबविल्या जातात यापैकी महिलांना बौद्ध धम्माचे प्रशिक्षण देण्याकरता धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर हे महत्वपूर्ण शिबिरे आयु.नी. गायत्री ताई रामटेके अध्यक्ष बल्लारपूर शहर शाखा आणि एड रमण पुणेकर साहेब अध्यक्ष बल्लारपूर तालुका शाखा, आयु.नि.अनुकला ताई वाघमारे केंद्रीय शिक्षिका,आयु.नि.पंचशीला ताई वेल्हे केंद्रीय शिक्षिका, आयु.नि. संगीता ताई शेंडे यांच्या अथक परिश्रमातून बल्लारपूर शहरात एकाच वेळेस पाच बुद्ध विहारामध्ये”धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे.
▪️ पंचशील बुध्द विहार बुध्द नगर वार्ड बल्लारपुर
▪️ यशोधरा महिला मैत्रीसंघ आयु.नि.सविता ताई अशोक थुलकर यांचे घरी,संतोषी माता वार्ड, बल्लारपूर
▪️ असित बुध्द विहार राजेद्र प्रसादवार्ड बल्लारपुर
▪️ पाली बुध्द विहार,विद्या नगर वार्ड बल्लारपुर
▪️ मैत्रेय बुद्ध विहार,गोकुल नगर वार्ड,बल्लारपूर
या सर्व शिबिराला दहा दिवस सतत मार्गदर्शन करणाऱ्या
▪️आयु.नि.सुजाता ताई लाटकर जिल्हा उपाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षिका
▪️आयु.नि.सपना ताई कुंभारे जिल्हा उपाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षिका
▪️आयु.नि.प्रगती ताई मेश्राम केंद्रीय शिक्षिका
▪️आयु.नि. कविताताई अलोने केंद्रीय शिक्षिका
▪️आयु.नि.समताताई लभाने,केंद्रीय शिक्षिका
या सर्व धम्म प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम दि 2 मे 2023 मंगळवार ला सायंकाळी 6.0 वाजता पाली बुद्ध विहार च्या भव्य पटांगामध्ये आयोजित केला आहे. तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने बल्लारपूर शहरांमध्ये होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून धम्म प्रबोधन चा लाभ घ्यावा असे आव्हान आयुनी गायत्री ताई रामटेके अध्यक्ष,भा बौ म बल्लारपूर शहर अँड रमण पुणेकर, अध्यक्ष, भा बौ म बल्लारपूर तालुका यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here