उद्या पासुन शहरातील पाणी पूरवठा होणार सुरळीत

0
263

उद्या पासुन शहरातील पाणी पूरवठा होणार सुरळीत

फुटलेल्या पाईप लाईनच्या कामाची यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी केली पाहणी

वेकोलीच्या कामामुळे शहराला पाणी पूरपाठा करणारी पद्मापूर येथील मुख्य पाईप लाईन फुटल्याने आज दिवसभर शहरातील पाणीपुरवठा बंद होता. याची माहिती मिळताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी पाईपलाईनच्या दुरुस्ती कामाची पाहणी केली असुन उद्या पासून सदर पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, सायली येरणे, शहर संघटक विश्वजित शहा, हेरमन जोसेफ, बंगाली विभाग महिला शहर संघटिका सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, आशा देशमुख, वंदना हजारे, निलिमा वनकर, कविता निखारे, करणसिंब बैस आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर शहराला इरई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो. मात्र पद्मापूर भागात वेकोलिचे काम सुरु आहे. या कामा दरम्यान शहराला पाणी पूरवठा करणारी मुख्य पाईप लाईन शतीग्रस्त झाली होती. परिणामी 40 तासापासून शहरातील पाणीपुरवठा खंडीत झाला होता. याची माहिती मिळताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी पाईप लाईच्या दुरुस्तीचे काम सुरु असलेल्या ठिकाणी भेट देत सुरु असलेल्या कामाची पाहणी केली आहे. सदर काम युध्द स्तरावर सुरु असून उद्या पर्यंत शहरातील पाणी पूरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, शहर युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here