गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दिशेने राजुराचे पुन्हा एक पाऊल पुढे…

0
2244

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दिशेने राजुराचे पुन्हा एक पाऊल पुढे…

राजुरा (चंद्रपूर), २० मार्च : शांत संयमी असणारा राजुरा आता नव-नविन प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जणू अव्वल येतो की काय अशी स्पर्धाच लागली आहे. पहिले घरफोडीचे सत्र सुरु झाले. नंतर नेहमीच्याच कोळसा चोरीला वेगळा रंग आला. आणि आता एका किसान जिनिंग येथे काम करणाऱ्या काटा ऑपरेटर वर दरोड्याच्या प्रयत्नात भ्याड हल्ला काल १९ तारखेला ला कऱण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, बल्लारपूर तालुक्यातील कवडजई येथील रहिवासी असलेला सोनबा गजानन चन्ने हा मागील ७ वर्षा पासून राजुरा येथील प्रतिष्ठित व्यापारी राधेशाम अडानिया यांच्या किसान जिनींग तुलाना येथे काटा ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. काल दिनांक १९ मार्च ला दुपारी २ वाजता तो हमलांना सोबत घेऊन मिनी आयचर गाडी क्र. एमएच-३४ बीजी-७१०१ ने माथरा येथील शेतकरी व खामोणा गावचे सरपंच हरिदास झाडे यांचा कापूस भरण्याकरिता गेला. ३० क्विंटल कापूस भरून तो स्वतः गाडी चालवत येत असताना रामपुरच्या पहिले माथरा रोड वर काही अज्ञात तरुणांनी गाडी आडवी लाऊन त्याला हाथ दाखवत थांबायला सांगितले. त्याला वाटले की काही झाले असेल म्हणून त्याने गाडीचा वेग कमी करुन गाडी थांबवली. जशी गाडी थांबवली तसे ४-५ तरुणांनी त्याला शिवीगाळ करत त्याच्या बजुचे दार खेचत लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर वार करत बुक्क्यांनी मारहाण केली. त्यासोबत असलेल्या हमलांनी त्याला वाचावण्या करिता दुसऱ्या बाजूने प्रयत्न केला पण ते दरोडे खोर दुसऱ्या दरवाजातून त्यांना मारहाण करत होते. त्यांनी त्याच्या गळ्यातील १५ ग्राम सोन्याची साखळी ९० हजार रुपये किमतीची आणि १० हजार रोख रक्कम लंपास करून चतुर्भुज झाले. ही सर्व घटना ७.४० मिनिटांची रात्रीची (सायंकाळी) आहे.

या अगोदर काही महिन्यांपूर्वी राजुरा येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेश झंवर यांच्यावर सुद्धा दोनदा अश्या प्रकारे जीवघेणा हल्ला कापनगाव परीसरात झाला आहे. या घटनेने पुन्हा खाजगी काम करणाऱ्या नोकर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस याबाबत किती गंभीर आहेत. या घटनेचा किती सखोल तपास करून दोषींवर काय कठोर कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून नविन पोलिस निरीक्षक व डी. बी. (डीटेक्टिव ब्रांच) समोर मोठे आवाहन आहे. या दरोडेखोर टोळक्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here