आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे जुन्या पेन्शन च्या मागणीला समर्थन पत्र

0
349

आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे जुन्या पेन्शन च्या मागणीला समर्थन पत्र

पंजाब, दिल्ली सरकारला परवडते महाराष्ट्राला का नाही – सुनिल मुसळे जिल्हाध्यक्ष आप


सध्या सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू ठेवावी यासाठी आंदोलन करीत आहे आहेत. मंगळवार दिनांक १४ मार्च २०२३ पासून सरकारी कर्मचा-यांच्या संघटना आपल्या मागणीसाठी संपावर आहे. आज संपाचा ५ वा दिवस आम आदमी पार्टीचा जुन्या पेन्शन योजने संदर्भातील सरकारी कर्मचा-यांच्या मागणीला आणि आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे. पंजाबमध्ये निवडणुकीच्या वेळी आम आदमी पक्षाने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या आश्वासन दिले होते. आणि सत्तेत येताच पंजाबमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठराव मंजूर केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा पंजाब सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले होते.

२००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवी राष्ट्रीय निवृत्तीवेतन पद्धती लागू करण्यात आलीय. या योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेली काही रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. त्यामुळे निवृत्तीपश्चात मिळू शकणारा लाभ हा त्या त्या समयीच्या बाजारस्थितीनुरूप असेल. अर्थात शेअर बाजारातील सरकारी गुंतवणुकीची कशी वाट लागते याचा अनुभव देशाने अनेकदा घेतला आहे. या इतर अनेक कारणांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांकडून नव्या पेन्शन योजनेला विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

तसेच सरकारने नवीन भरती चे खाजगीकरन करण्याचे ठरविले आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी ठिकठिकाणी आंदोलन करतायत. आम आदमी पार्टी चंद्रपूर चा सरकारी कर्मचा-यांच्या या मागणीला पूर्ण पाठींबा आहे. आज आंदोलनाच्या विविध ठिकाणी आम आदमी पार्टी च्या शिष्टमंडळाने भेटी दिल्या व समर्थनाचे पत्र दिले.

यावेळी सुनील देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष, भिवराज सोनी संघटन मंत्री, योगेश गोखरे महानगर अध्यक्ष, ॲड. सुनिताताई पाटील शहर महिला अध्यक्षा, सुनील सदभैये शहर उपाध्यक्ष, सिकेंदर सागोरे शहर संघटन मंत्री, संतोष बोपचे युवा शहर अध्यक्ष, स्वप्नील घागरगुंडे शहर कोषाध्यक्ष, जास्मिन शेख, महानगर महिला उपाध्यक्ष, मीना पोटफोडे महानगर महिला उपाध्यक्ष, सुहास रामटेके झोन क्रमांक तीन महिला पदाधिकारी, सुहानी दुर्योधन झोन क्रमांक एक महिला पदाधिकारी, शबनम शेख विशेष कार्यकारी पदाधिकारी, कविता टिपले घुगुस महिला पदाधिकारी, पुष्पा बुधवारे मॅडम तथा ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here