शासकीय रुग्णालयात “ना औषध, ना स्वच्छता” सर्व रामभरोसे

0
332

शासकीय रुग्णालयात “ना औषध, ना स्वच्छता” सर्व रामभरोसे

राजुरेड्डी यांच्या समोर नागरिकांनी समस्येचा वाचला पाढा

घुग्घूस शहरातील सामान्य रुग्णालयात गोरगरिब नागरिक, कष्टकरी, शेतकरी ,शेतमजूर, गरोदर महिला समाजातील आर्थिक दृष्ट्या वंचित घटक जे उपचारासाठी व औषधी साठी शासकीय रुग्णालयावर निर्भर आहेत त्यांना मोफत उपचार व औषधा पासून ही वंचित राहण्याची वेळ घुग्घूस शहरात आलेली आहे.

शहरातील शासकीय रुग्णालयातील समस्ये संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांनी आज सकाळी अकरा वाजता रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देत समस्येची पाहणी केली
रुग्णांशी संवाद साधला याप्रसंगी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या गेल्या अनेक महिन्यापासून रुग्णालयात औषधच उपलब्ध होत नसून रुग्णांना बाहेरून औषध विकत घ्यावी लागते अथवा तुटपुंज्या औषधांवर काम भागवावा लागतो.

जन्माला येणारा बाळ हा अत्यंत संवेदनशील असतो त्याच्या साठी स्वच्छ हवेदार व आनंदित वातावरण हवं असतो मात्र येथील प्रसूतीगृह धुळीने माखलेले आहेत. पिण्याच्या पाण्याची फिल्टर मशीन परिसर हा घाणीने व खर्र्याच्या पिचकाऱ्याने भरलेला आहे.

शौचालय मोळकळीस आलेला आहे रुग्णालयाच्या दर्शनी भागावर दर्शविलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव तसेच सामाजिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा नावे दर्शविणारा तक्ता अजून ही तसाच असून वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकदकर यांची बदली होऊन वर्ष लोटली मात्र नाव अजून ही त्यांचाच दिसत आहे.

कर्तव्यावर असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी कुंडू यांच्याशी रुग्णालयाच्या गैर व्यवस्थे संबंधी माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयाला जिल्हा पातळीवरून औषधसाठा उपलब्ध होत नाही रुग्ण डॉक्टरांच्या अंगावर येतात औषधी करिता शिवीगाळ करतात अनेकदा मी स्वतःच्या पैशाने रूग्णांना विकत औषध देत आहे. चार कर्मचारी कमी झाल्यामुळे स्वच्छता नेटाने राबविले जाऊ शकत नाही.

रुग्णालयातील भीषण परिस्थिती संदर्भात क्षेत्रातील खासदार बाळू धानोरकर,आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी भेट घेऊन लवकरात लवकर रुग्णालयाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू अन्यथा नागरीकांच्या आरोग्य हितासाठी तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडू अशी ग्वाही काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना दिला याप्रसंगी काँग्रेस नेते अलीम शेख,रोशन दंतलवार,कपिल गोगला,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here