सत्कर्म हा गुरूच्या सानिध्यात राहण्याचा मुख्य मार्ग आत्मसात करा : माजी आमदार संजय धोटे

91

सत्कर्म हा गुरूच्या सानिध्यात राहण्याचा मुख्य मार्ग आत्मसात करा : माजी आमदार संजय धोटे

(जिवती):- माणिकगड पहाडावर वसलेल्या कोलांडी येथे ज्ञानगंगा नित्यानंद केंद्र च्या माध्यमातून शंकरराव देवाळकर यांनी संकलित केलेले “सच्चित नित्यानंद” पुस्तिकेचे विमोचन माजी आमदार संजय धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

जिवनात चांगल्या कार्याची दखल भगवंत चरणी होतय्,म्हणून आपल्या जिवनात सदैव सत्कर्म करीत रहा, चांगली फलश्रुती आपणास नक्की अवगत होईल,असे प्रतिपादन संजय धोटे यांनी केले.

पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, आपल्या कर्मानुसार आपला जिवनक्रम निर्मात्यांनी ठरविलेला आहे.म्हणुन चांगल्या कार्याची दखल भगवंत चरणी नक्की होतय् सत्कर्म करीत रहा असेही ते म्हणाले. ज्ञानगंगा नित्यानंद केंद्र कोलांडी च्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला युवा उद्योजक निलेश ताजणे, शंकर देवाळकर, प्रतिष्ठित व्यक्तीमत्व सुरेश केंद्रे, शिवाजीराव शेलोकर,बळी हेपट यांच्या सह नित्यानंद महाराज यांचे सानिध्यातील घोंगे गुरूजी यांचे साधक,मातृशक्ती गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.

advt