चौथ्या दिवशीही वाघाची दहशत कायम:वाघाला बंदोबस्त करण्यास वन विभागाला अपयश

0
992

विजय जाधव मूल तालुका प्रतिनिधी
मुल तालुक्यातील नांदगाव शेत शिवारात वाघ मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी नांदगाव शेत शिवारातील चोपण भागात वाघ निघाला. अशी चर्चा सुरू असतानाच काल गोवर्धन येथील बंडू दाऊजी शिंदे यांच्या शेतात वाघ दिसून आला. यामुळे शेतात काम करणारे मजूर वर्ग घरी निघून आले.वन विभागाला माहिती दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी रात्र गस्त घातली. परंतु वाघाला पकडण्यात अपयश आले.
पुन्हा आज दुपारी साडेबारा ते एक वाजे च्या दरम्यान नांदगाव शेत शिवारातील फुटाणा मार्गावरून कसर बोडी च्या दिशेने वाघ दिसून आल्याचे अनेकांनी बघीतले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन वाघाची शोधाशोध केली. परंतु आजही वाघाला पकडण्यात वन विभागाला यश आल्याचे दिसून येत नाही.
या चार दिवसातील घटनांमुळे व वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी आपल्या शेतात जाण्यास घाबरत असून रब्बी पिकांची अतोनात नुकसान रानटी डुकरांच्या हैदोषामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. वाघाला त्वरित जेर बंद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नांदगाव परिसरातील तमाम शेतकरी बांधवांनी केलेली आहे.

विजय जाधव , ताालुकाप्रतिनिधी मुुल जााााााााााााााा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here