पोर्ला येथे आंतरजातीय विवाहाचा स्वागत समारंभ 

0
796

 

🔹दोन्ही परिवारांच्या सहमतीने आनंदाचे वातावरण.

🔹अतिथी मान्यवरांनी दिल्या दाम्पत्यांना शुभेच्छा.

 

गडचिरोली / चक्रधर मेश्राम दि. 17/1/2023:– गडचिरोली येथुन जवळच असलेल्या पोलाऀ येथील मायावती पिसाराम येंचिलवार व मेंढा येथील सुरेश रोहिदास लाडे ‘ यांचा आंतरजातीय विवाह होवून स्वागत समारंभाचा कार्यक्रम तुलतूली प्रकल्प ‘ पोलाऀ येथे वधू – वरांच्या आई – वडीलांच्या सहमतीने व प्रमुख मान्यवरच्या साक्षीने पार पडला . सदर स्वागत समारंभास डॉ . महेश कोपूलवार ‘ प्रा . मुनिश्वर बोरकर ‘ हंसराज उंदिरवाडे , माजी उपनिरिक्षक देविदास भोयर ‘ तंटामुक्ती चे अध्यक्ष भाष्करराव मेश्राम पोलीस पाटिल हितेंद्र बारसागडे , माजी उपसरपंच बापुजी फरांडे , भैसारे अशोक खोबरागडे , परशराम बांबोळे , संतोष दशमुखे , दत्तुजी कळमवार ‘ आदिच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला . आंतरजातीय विवाह सोहळा हि काळाची गरज आहे . जाती – पातीचे बंधन तोडून पोरला येथील येंचिलवार व लाडे कुटुबियांनी एक आदर्श घडविला . मान्यवरांनी वधू वरांच्या भविष्यात भावी जीवन सुख व समृध्दीचे, आनंदी,आणि आरोग्यदायी जावो अश्या शुभेच्छा दिल्यात तर यैचिलवार’ – लाळे परिवाराचे आभार व्यक्त करून अश्या कुटुंबापासुन समाजाने आदर्श घडवावा असे विचार व्यक्त केलेत . स्वागत समारंभात भोजनदान देवुन . डॉन्स हंगामा घेण्यात आला . स्वागत समारंभास अमृत सुनकिनवार ‘ केशव सामृतवार ‘ रवि सामृतवार ‘ रेखा दत्तुजी कळमवार ‘ विशाखा निलेश पटले ,माया पांडू अम्मावार ‘ वच्छला शनिराम येंचिलवार . शुभम दशमुखे , बारसागडे सहीत पोर्ला व मेंढा येथील बहुसंख्य मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here