आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत क्रांतीनगरीचा विक्रम

165

आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत क्रांतीनगरीचा विक्रम

स्पर्धेसाठी भारतीय संघात चिमुरच्या विक्रम बंगेरीया ची निवड


चिमूर/आशिष गजभिये
येथील धावपट्टू विक्रम बंगेरीया यांची बांगलादेश येथील ढाका येथे आगामी २० जानेवारीला होऊ घातलेल्या आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत बागबंधु शेख मुजीब ढाका मॅरेथॉन २०२३ या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष गटातून (४२किमी) करिता निवड झाली आहे. त्याच्या या निवडीने सद्या चिमूर परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

मूळचा क्रांतीनगरी चिमूर चा रहिवाशी असलेला विक्रम हा भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. आजपर्यंत त्याने देशांतर्गत विविध राष्टीय स्पर्धेत त्याने आपली छाप सोडली असून अनेक स्पर्धा आपल्या नावाने केल्या आहेत.

विक्रम सद्या भारतीय सैन्य क्रीडा प्रशिक्षण संस्था पुणे असून या स्पर्धेसाठी तयारी करीत आहे. झालेल्या निवडीने त्याच्या मातृभूमी चिमूरसह परिसरात आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या या निवडीने सद्या त्याच्यावर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव सूरु आहे.

“माझ्या या निवडीचे श्रेय मी माझ्या मातृभूमी ला व माझ्या गुरुजनाना देतो.माझ्या वरील अपेक्षांचे ओझे आणखी वाढले जेतेपद पटकविन्याच ध्येय असून ऑलम्पिक मध्ये मला देशाच प्रतिनिधित्व करायचं”
विक्रम बंगेरीया, आंतरराष्ट्रीय धावपट्टू

advt