अखेरच्या ५ व्या फेरीत बाजी मारुन राज्यस्तरीय महाकाव्य लेखन स्पर्धेत नामवंत सहज सुचलच्या अर्जुमनबानाे शेख ठरल्या सर्वाेत्क्रूष्ट!
झाडी बाेली साहित्य मंडळाची स्पर्धा!
चंद्रपूर । किरण घाटे : झाडी बाेली साहित्य मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय महाकाव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यांत आली हाेती. आयाेजकांच्या!स्पर्धेत सहभागी व्हा! या आवाहनाला प्रतिसाद देत या स्पर्धेत राज्यातील अनेक स्पर्घकांनी स्वयंस्फुर्तिने भाग घेतला हाेता. दि. ११आँक्टाेबरला या महाकाव्य लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या स्पर्धेत एकुण पाच फे-या घेण्यात आल्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील नामवंत व सुपरिचीत सहज सुचल काव्यकुंजच्या सदस्या तथा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर येथील निवासी अर्जुमनबानाे शेख या सर्वाेत्क्रूष्ट क्रंमाकाच्या मानकरी ठरल्या! विशेष म्हणजे अर्जुमन शेख ह्या अतिदुर्गम भागातील जिवती येथे शिक्षिका असुन त्या ब-याच वर्षापासुन साहित्य क्षेत्राशी जुळल्या आहे आज पावेताे त्यांनी विपुल साहित्य लिहले असुन त्यातील काही साहित्य (कविता व लेख ) स्थानिक वर्तमान पत्रासह विदर्भ स्तरीय वर्तमान पत्रात प्रसिध्द झाले आहे.
राजूरा सास्तीच्या मायाताई काेसरे यांचे काव्यकुंज (ग्रुप) च्या त्या (नवाेदित कवयित्रिंच्या) मार्गदर्शिका आहे. झाडी बाेली साहित्य मंडळाची सदरहु स्पर्धा आयोजित करण्यांत आयोजक ग्रामगीताचार्य कवि बंडाेपंत बाेढेकर, अरुण झगडकर (कवि)व रामक्रूष्ण चनकापुरे यांचे योगदान माेलाचे ठरले आहे.
या भव्य महाकाव्य लेखन स्पर्धेत सर्वाेत्क्रूष्ट ठरल्या बद्दल सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका मेघाताई धाेटे, सहसंयाेजिका मायाताई काेसरे, सूरज दादा ठाकरे, प्रभा अगडे (नागपूर) जास्मिन शेख, मंजुषा दरवरे, नितिन लाेणारे, संदीप बाेबाटे, यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटिका वंदना हातगांवकर, भाग्यश्री हांडे, कविता चाफले, प्रतिमा नंदेश्वर, सुवर्णा कुळमेथे, श्रूती उराणकर, रजनी रनदिवे, पूनम रामटेके, सुविधा चांदेकर, वंदना आगरकाठे, वंदना आगलावे, ज्याेती मेहरकुरे, वर्षा शेंडे, स्मिता बांडगे, नयना झाडे, विजया तत्वादी, मयुरी समर्थ, विजया भांगे, शंकर चव्हाण, रामदास हेमके, सुशीला पाेरेड्डीवार, अल्का गंगशेट्टीवार, अँड. अंजली साळवे, अमर राठौड़, अल्का माेटघरे व सराेज हिवरे यांनी अर्जुमन बानाे शेख यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.