राजुरात बनावट नोटा देण्याकरीता आलेले दोन इसम जेरबंद

0
485

राजुरात बनावट नोटा देण्याकरीता आलेले दोन इसम जेरबंद


राजुरा – स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने चाळीस हजार रुपयाच्या मोबदल्यात पाच लाखांच्या नकली नोटा विक्री करणाऱ्या दोघांना राजुरा ते आसिफाबाद रोडवरील रेल्वे गेट जवळ सापळा रचुन जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14/01/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ला माहिती मिळाली कि आसिफाबाद (तेलंगाना) येथील निखील भोजेकर नामक इसम हा भरपुर लोकांना चलनातील नोटांचे बनावट नोटा कमी किंमतीत देण्याचे आमीष दाखवुन त्यांना लहान मुले खेळायच्या नोटा देऊन लोकांची फसवणुक करीत आहे. खबरीला 40 हजार रू. च्या बदल्यात 5 लाख रू. च्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवले.

सदर इसम बनावट नोटा देण्याकरीता राजुरा येथे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील सपोनि मंगेश भोयर यांचे सोबत स्थानिक गुन्हे शाखा येथील अंमलदारांचे पथक तयार करून मिळालेल्या माहीतीची खातरजमा करून कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती मिळताच सपोनि मंगेश भोयर व त्यांचे पथकाने राजुरा ते आसिफाबाद रोडवरील रेल्वे गेट जवळ सापळा रचुन बनावट नोटा देण्याकरीता आलेल्या दोन आरोपी नामे निखील हनुमान भोजेकर, वय 24 वर्षे रा. चनाखा ता. वणी जि. यवतमाळ व सैफुद्दीन जलाउद्दीन सैयद, वय 22 वर्षे रा. सिंधोला ता. वणी जि. यवतमाळ यांना खबरीस नोटा देत असतांना त्यांचे ताब्यातुन 500 रू. नोटाच्या आकाराचे हुबेहुब 500 रू. नोटा प्रमाणे दिसणारे हिरव्या रंगाच्या “भारतीय बच्चो का बँक मार्फत , 500 रू.” असे छापीव 4408 कागदांचे तिन बंडल मिळुन आले, सदर छापीव कागदांबाबत संशय येऊ नये म्हणुन प्रत्येक बंडल चे पुढे व मागे चलनातील दोन 500 रू. च्या नोटा अशा एकुण 06 नोटा किंमत 3000 /- रू., दोन मोबाईल हॅन्डसेट किंमत 75,000/- रू. अर्टीगा वाहन क्रमांक एमएच / 46 / डब्लू / 7545 किंमत 10,00,000/- रू. असा एकूण 75,000/- रू. अर्टीगा वाहन क्रमांक एमएच 46 डब्लु 7545 किंमत 10,00,000/- रू. असा एकुण 10,78,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही आरोपींविरूध्द पोलीस स्टेशन राजुरा येथे अप. क. 19 / 2023 कलम 420, 34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत करीत आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, अंमलदार संजय आतकूलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, रविंद्र पंधरे, कुंदनसिंग बावरी, नरेश डाहुले, चालक प्रमोद डंभारे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here