*-प्रसिद्धीच्या हव्यासापोटी शासनाच्या जिल्हा विकास निधी व १५ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत पोंभूर्णा तालुक्यातील जि.प.सदस्य व पं.स.सदस्यानी मारला “ताव”*
पोंभुर्णा: जिल्हा विकास निधी/ पंचयातराज / पंधरावा वित्त आयोग निधी अंतर्गत पाण्याच्या कॅन व बसण्याच्या बाकांवर स्व:चा नाव कोरल्याने शासकीय योजनेचा गैरवापर करण्यात आला असल्याने जनमाणसात तिव्र संताप होत आहे. जिल्हा विकास निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असुन स्वताची जनमानसात प्रसिद्धीव्हावी या केविलवाण्या नादात शासकीय पैस्यातून स्व:ताच्या नावाचा गवगवा हि नेते मंडळी केलेली पाहायला मिळत आहेत.
आपण निवडून दिलेल्या जि.प. व पं.स.सदस्यांनी जनतेच्या विकास निधीवर जो डल्ला मारला आहे त्याला खरा लोकप्रतिनिधी म्हणता येईल का? असे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.