अंधश्रद्धा ही व्याधी नष्ट करण्यासाठी सामाजिक प्रबोधनाची गरज – ठाणेदार मेश्राम

0
402

अंधश्रद्धा ही व्याधी नष्ट करण्यासाठी सामाजिक प्रबोधनाची गरज – ठाणेदार मेश्राम

शिवापूर (बंदर) येथील रा. तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

चिमूर/तालुका प्रतिनिधी : समाजमनाला वर्षानुवर्षे पोखरून टाकणारी अंधश्रद्धा ही व्याधी नष्ट करायची असेल तर सामजिक प्रबोधनाची नितांत गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलन सारख्या शेकडो समित्यांनी या साठी पुढाकार घेतला पाहिजे. असं प्रतिपादन ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी केलं. ते शिवापूर (बंदर) येथे आयोजित वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्थिती महोत्सवात अंधश्रद्धा निर्मूलन या कार्यक्रमात बोलत होते.

या प्रसंगी मंचावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे चिमूर तालुका सचिव सारंग भीमटे, सरपंच मंजुषा नन्नावरे, उपसरपंच आदित्य वासनिक, सदस्य मनी रॉय, गुरुदेव सेवा मंडळ चे अध्यक्ष दिलीप दडमल आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ठाणेदार मेश्राम यांनी विज्ञानाचे सखोल उदाहरण देत ग्रह, तारे,ग्रहण या सर्वाविषयी शास्त्रीय माहिती आज विज्ञान उपलब्ध करून देत असून याचे प्रात्यक्षिक आपण इंटरनेट व टीव्ही च्या माध्यमातून बघतो असं सांगितलं. श्रद्धेची सर्वांनी उपासना करावी पण अंधश्रद्धाला बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केलं. अनिस चे सचिव सारंग भीमटे यांनी बुवाबाजी चे प्रात्यक्षिक करून दाखवीत त्या मागील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा खुलासा केला. या कार्यक्रमाचे संचालन अनिरुद्ध वासनिक, प्रास्तविक निलेश नन्नावरे तर आभार दिलीप दडमल यांनी मानले. या कार्यक्रमाला शेकडो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here