आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा…

386

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा…


आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही आरोग्य विमा योजना असुन केंद्र शासन व्दारे तथा राज्य शासन व्दारे राबविण्यात येत आहे. या आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातुन प्रती कुंटुब प्रती वर्ष रुपये 5 लक्षा पर्यत 1209 सर्जीकल व मेडीकल उपचाराच्या माध्यमातुन मान्यता प्राप्त खाजगी व शासकीय रुग्णालया मार्फत मोफत सेवा देण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये पात्र लाभार्थी हे सामाजिक, आर्थीक व जातीनिहाय जनगणना 2011 च्या यादी नुसार तयार करण्यात आले असुन सदर पात्र लाभार्थी यांची वार्ड निहाय यादी नगर परिषद राजुरा कार्यालय नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे. सदर यादी मध्ये नाव असणाऱ्या पात्र लाभार्थ्यास स्वताचे आयुष्मान कार्ड (गोल्डन ई-कार्ड ) तयार करून देण्यात येणार आहे.

त्याकरिता नगर परिषद राजुरा क्षेत्रात सदर आयुष्मान कार्ड काढण्याकरिता खालील प्रमाणे केंद्र तयार करण्यात आले आहे.
१.नगर परिषद कार्यालय मध्ये.
२.श्री.साईराम सेवा केंद्र (तहसिल कार्यालय राजुरा समोर )
३.स्पर्श इन्फोटेके (श्रीनिवास कॉलनी समोर, कर्नल चौक )
४. ब्राईट कंम्प्युटर (गोली वडापाव च्या बाजुला, कर्नल चौक )
५. ब्राईट कंम्प्युटर (कर्नल चौक)

उपरोक्त केंद्राच्या ठिकाणी पात्र लाभार्थी यांनी स्वताचे आधार कार्ड आणी त्यांना वितरित करण्यात आलेल्या मा.प्रधानमंत्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र किंवा राशन कार्ड (मुळप्रत) हे कागदपत्र e KYC करिता सोबत आणने आवश्यक आहे. जेणेकरून आपले आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत चे आयुष्मान कार्ड (गोल्डन ई – कार्ड ) त्वरित तयार करून देता येईल.

करिता शहरातील सर्व सुजान नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी पात्र लाभार्थ्याच्या यादी मध्ये स्वताचे नाव असल्यास कागदपत्रासोबत वरिल केंद्रवरती त्वरित संपर्क साधुन सदर आयुष्मान कार्ड (गोल्डन ई – कार्ड ) त्वरित तयार करून घेण्यात यावे. व शासनाच्या या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे नगर परिषद राजुरा चे मुख्याधिकारी यांनी कळविले आहे.

advt