डोंगरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे चार सदस्य विजयी

340

डोंगरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे चार सदस्य विजयी


नुकत्याच राजुरा तालुक्यातील चार ग्रामपंचायतीतील निडवणुका पार पडल्यानंतर आज मतमोजणी राजुरा येथे पार पडली. यात डोंगरगाव ग्रामपंचायत येथे वंचित बहुजन आघाडीचे चार सदस्य विजयी झाले. यावेळी विजयी सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.

मतमोजणी पार पडून निकाल घोषित करण्यात आले. यात डोंगरगाव येथे सरपंच पदी काँग्रेसच्या इंदिरा बंडू मेश्राम, विरुर (स्टे.) सरपंचपदी बंडू आलाम (काँग्रेस), देवाडा सरपंचपदी शंकर मडावी (भाजपा) तर हरदोना येथे सरपंच पदी कांग्रेसच्या सगुणा अनिल मेश्राम विजयी झाल्या.

advt