चंद्रपूरच्या महिला पत्रकार तथा सहज सुचलच्या सदस्या जास्मिन शेख यांची पत्रकार संरक्षण समितीच्या महिला मार्गदर्शिकापदी निवड!
चंद्रपूर । किरण घाटे
चंद्रपूर -गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातील प्रख्यात सहज सुचल महिला हक्क व्यासपीठ ग्रुपच्या सदस्या तथा चंद्रपूर नगरीच्या महिला पत्रकार जास्मिन शेख यांची नेशनल साेशालिस्ट पार्टी संलग्नित माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या महिला मार्गदर्शिका पदी निवड झाली आहे. या आशयाचे निवड समितीचे पत्र जास्मिन शेख यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. सामाजिक कार्यात आपणास विशेष रुची व आवड असल्याचे जास्मिन शेख यांनी इम्पँक्ट २४ च्या प्रतिनिधीशी बाेलतांना म्हणाल्या !
गत दाेन वर्षापासुन महाराष्ट्रातील लाेकप्रिय (महिलांचे हक्काचे व्यासपीठ असणा-या) सहज सुचलच्या त्या सदस्या असुन सामाजिक कार्यात विदर्भात अग्रकमी असणा-या यंग चांदा ब्रिगेडच्या ही त्या सदस्या आहे. त्यांचे या निवडीचे अभिनंदन सहज सुचल मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे, सहसंयाेजिका मायाताई काेसरे, पूनम रामटेके, मयुरी समर्थ, रितू गायकवाड़, प्रभा अगडे, स्मिता बांडगे, प्रतिमा नंदेश्वर, सुवर्णा कुळमेथे, विजया भांगे, मंजुषा दरवरे, कविता चाफले, विजया तत्वादी, वंदना मुनघाटे, नितिन लाेणारे, शंकर चव्हाण, अमर राठौड़, संदीप बाेबाटे, भूपेश कावळे, रामदास हेमके, ज्याेती इंगळे, प्रतीक्षा झाडे, सुविद्या चांदेकर, श्रद्धा हिवरे, हीरा दारुंडे, सराेज हिवरे, अरुणा गावुत्रे, वंदना हातगावकर, भाग्यश्री हांडे आदिंनी केले आहे.