“ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र आदरांजली” नागवंश युथ फोर्स राजुराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0
814

“ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र आदरांजली” नागवंश युथ फोर्स राजुराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

राजुरा : सामाजिक कार्यात नेहमी हिरीरीने भाग घेऊन अग्रेसर राहणारे सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विश्वभूषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने खरी आदरांजली अर्पण करण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नागवंश युथ फोर्स राजुरा च्या वतीने केले. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र आदरांजली वाहण्यात आली.

अमोल राऊत वर्षातून दोनदा रक्त शिबिराचे आयोजन करून गरीब, गरजूंना नेहमी रक्ताची मदत मोठ्या सेवेभावेने करतात. 6 डिसेंबरला परमपूज्य, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली.

बुद्धभूमी बसस्थानक समोर राजुरा येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागवंश युथ फोर्स राजुराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. यावेळी सर्व रक्तदात्यांना पुस्तक भेट देण्यात आले.

यावेळी शिबिरात एपीआय प्रशांत साखरे, डॉ. बांबोळे, पीएसआय वडतकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत, धनराज उमरे, सुरेंद्र फुसाटे, राहुल अंबादे, रविकिरण बावणे, नूतन ब्राह्मणे, निखिल वनकर, युवराज कातकर, जय खोब्रागडे, नितीन नगराळे, रवी झाडे, यंग मेन्स बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन ग्रुप, डॉ. कुळमेथे, ब्लड बँकेच्या चमुमध्ये सामाजिक सेवा अधिक्षक पंकज पवार, इंटर्न कुशाग्र मिश्रा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आनंद चव्हाण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पल्लवी पवार, सहाय्यक तंत्रज्ञ सुखदेव चांदेकर, चालक रुपेश घुमे, परिचर साहिल भसारकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here