बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

698

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

 

राजुरा : आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आनंदगुडा (लक्कडकोट) येथील शेतकऱ्यास बिबट्याने ठार केल्याची घटना घडली. हि राजुरा तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची महिनाभरातील दुसरी घटना आहे. 6 नोव्हेंबर तुम्मागुडा (सुब्बई) येथील शेतकऱ्यास बिबट्याने ठार केले होते.

सदर शेतकऱ्याचे नाव जंगु मारू कुरसंगे (58) असे असून त्याच्या पश्चात पत्नी व 2 मुले असा आप्त परिवार आहे. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली असून वनविभागविरोधात नागरिकांत प्रचंड रोष दिसून येत आहे. घटनास्थळी वनविभागाची चमू दाखल झाली आहे.

advt