वंचित बहुजन आघाडी चे धरणे आंदोलन
हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या!

जिल्हाधिकारी मार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर
चंद्रपूर । उत्तरप्रदेश मधील हाथरस मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पीडित मुलीच्या कबुली बयानाच्या आधारे आरोपींना फाशीची शिक्षा तत्काळ द्यावी. या या मागणीकरीता वंचित बहुजन आघाडी चंद्रपूरच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत केंद्र सरकारला सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.
योगी सरकारच्या व केंद्र सरकारच्या विरोधात प्रत्येक वक्त्याने निषेध दर्शवला. आंदोलनाला विशेष उपस्थिती विदर्भ कमिटी सदस्य मा. राजुभाऊ झोडे व अनिरुद्ध वनकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण गावतूरे, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, जिल्हा महासचिव धिरजभाऊ बांबोडे, शहर अध्यक्ष बंडुभाऊ ठेंगरे, शहर प्रवक्ता रामजी जुनघरे, शहर संघटक राजू किर्तक, शहर महासचिव नितीन रामटेके, शहर महासचिव सुभाषचंद्र ढोलने, शहर उपाध्यक्ष सुभाष थोरात, शहर उपाध्यक्ष सुमित मेश्राम, आय टी सेल प्रमुख सोनल वाळके, सुनील कातकर उपाध्यक्ष शहर, जगदीश खोब्रागडे भारतीय बौद्ध महासभा, रमेश ठेंगरे, मिलिंद दुर्गे, विशेष निमगडे,
तनुजा रायपूरे, नीशाताई ठेंगरे, अलोने मॅडम, नेहा मेश्राम तसेच समस्त महिला आघाडी, कपूरदास दुपारे भद्रावती, दुरेश तेलंग, गोंडपिपरी टीम, बल्लारपूर टीम, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सहकारी इत्यादी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.