काँग्रेसचे दीपक खेकारे खिर्डीचे उपसरपंच

0
366

काँग्रेसचे दीपक खेकारे खिर्डीचे उपसरपंच

 

 

गडचांदूर (कोरपना) : तालुक्यातील खिर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी शुक्रवारी (ता. ११) निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने मतदान घेण्यात आले. यात दीपक खेकारे यांनी विजय प्राप्त केला.

दहा सदस्यीय खिर्डी ग्रामपंचायतीसाठी १६ ऑक्टोबरला मतदान पार पडले. काँग्रेसचे सरपंचांसह एकूण ७ उमेदवार, शेतकरी संघटनेचे ३ उमेदवार निवडून आले होते. नवनिर्वाचित सरपंच श्यामराव सलाम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत खिर्डी कार्यालयात आज उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

या पदासाठी काँग्रेसकडून दीपक खेकारे यांनी, तर शेतकरी संघटनेकडून कुमरे यांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे मतदान घेण्यात आले. यात खेकारे यांना सात, तर कुमरे यांना तीन मते मिळाली. यावेळ पक्षाकडून गटनेता म्हणून शयमसुंदर पेंदोर यांची नियुक्ती करण्यात आली सर्व ग्राम पंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here