शेगांव-रहाटगाव रस्ते काँक्रिटीकरणाच्या रखडलेल्या कामाला जलदगतीने पूर्ण करा! 

0
331

शेगांव-रहाटगाव रस्ते काँक्रिटीकरणाच्या रखडलेल्या कामाला जलदगतीने पूर्ण करा! 

आ. सुलभाताई खोडके यांचे संबंधितांना निर्देश, खड्डेमय रस्त्याची ऑनस्पॉट पाहणी

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती -: गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या व अर्धवट असलेल्या कामांना गती देण्याला घेऊन अमरावतीच्या आ. सौ .सुलभाताई खोडके यांनी कामकाजाचा सपाटा सुरु केला आहे . नागरिकांना होणारी गैरसोय व संभाव्य धोका टाळण्यासह नागरिकांना उत्तम सुविधा व्हावी म्हणून आ. सुलभाताई खोडके यांनी ऑनस्पॉट पाहणी करून संबंधित प्रशासनाशी योग्य सांगड घालीत या रखडलेल्या कामांना जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालविले आहे . अशातच अमरावती महापालिका क्षेत्रातील शेगांव – रहांटगांव मार्गावरील सिमेंट कॉक्रीटीकरणाचे रस्ते बांधकाम संथगतीने सुरु असल्याने या मार्गाने अवागमन करतांना नागरीकांची होणारी गैरसोय , रस्त्याचे रखडलेल्या कामामुळे विकास कामाचे पुर्ततेला होणारा विलंब आणि सुरक्षीत रहदारीकरीता व उपाययोजनांच्या अंमलबजावणीला घेवुन बुधावर दिनांक 07 ऑक्टोंबर 2020 रोजी आ. सौ. सुलभाताई खोडके यांचे वतीने शेगांव नाका – आशीयाड चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरापर्यंत रस्त्याची पाहणी करण्यात आली . यावेळी रस्ते कॉक्रीटीकरणाचे रखडलेल्या व प्रलंबित कामाचा प्रत्यक्ष पाहणीतून आढावा घेण्यात आला. या मार्गावरुन शेगांव, रहांटगांव, अर्जुन नगर तसेच सभोवताल परीसरातील बहुसंख्य नागरीक दैनंदिन कामकाजास्तव अवागमन करतात. तसेच निवासी क्षेत्र परीसरासह या मार्गावर रहांटगांव परीसरापर्यंत मोठ्या प्रमाणात बांधकामाची कामे जोरात सुरु असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांसह जड वाहतुकीची नेहमीच वर्दळ राहते. दरम्यान आशीयाड चौक ते शेगांव पर्यंतचे रस्ता बांधकाम रखडल्याने या मार्गावरील सदर वाहनांमुळे ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांची सुध्दा पाहणी करण्यासह यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी स्थानीय नागरीकांशी थेट संवाद साधीत त्यांच्या समस्या सुध्दा जाणुन घेतल्यात. सार्वजनीक बांधकाम विभागाच्या उपविभाग क्रमांक – एक चे उपविभागीय अभियंता – एस. झेड. काझी व सहायक अभियंता – विनोद बोरसे यांचे वतीने या प्रलंबीत कॉक्रीटीकरणा बाबत यावेळी माहीती विशद करण्यात आली. या सोबतच या रस्त्याचे 950 मीटर लांबीपैकी 400 मीटरचे कॉक्रीटीकरण पुर्ण झाल्याची माहिती देण्यासह उर्वरीत 450 मीटर लांबीमध्ये पुर्वी केलेल्या डांबरीकरणामध्ये भुयारी गटरचे मेनहोल सद्यास्थितीत दबल्या गेलेले आहे. सर्व मेनहोल शोधुन काढल्याशिवाय रस्त्याचे कॉक्रीटीकरणाचे कामकाजाला आरंभ करता येणार नाही. त्यामुळे या कॉक्रीटीकरणाचे कामाला विलंब होत आहे. तथापि दिनांक 6 ऑक्टोंबर 2020 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने एकुण 13 चेंबर पैकी 9 चेंबर सध्या शोधुन देण्यात आले आहे. उर्वरीत 4 चेंबर चा शोध हा सुरु कामकाजादरम्यान घेता येणार आहे. अशी माहिती देण्यासह सार्वजनीक बांधकाम विभागाच्या वतीने यावेळी आ. सौ. सुलभाताई खोडके यांना आता काम सुरु झाल्यासंदर्भात सुद्धा अवगत करण्यात आले.
यावेळी आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी शेगांव – रहाटगावपर्यंतच्या सिमेंटरस्ता कॉक्रीटीकरणाचे काम शिघ्रगतीने तथा गुणवत्तापुर्ण करण्याबाबतच्या या पाहणीदरम्यान संबंधीतांना सुचना केल्यात. या सोबतच नागरीकांच्या अडचणी लक्षात घेता, जनसामान्यांना सुसह्य होईल ,असे व्यापक नियोजन करीत सर्वांना अवागमन करण्याकरीता आवश्यक उपाययोजना व त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सुध्दा यावेळी आमदार महोदयांनी सार्वजनीक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या अधिका-यांना महत्वपुर्ण निर्देश दिलेत. तद्ननंतर आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी आशीयाड चौक ते शेगांव स्थित महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसर पर्यंत पायदळ जावुन या रस्त्याचे सद्यस्थितीबाबत यावेळी सखोल निरीक्षण केले.
आगामी काळात या परीसरातील वृक्षारोपणाचे नियोजना संदर्भात माहीती जाणून घेतांना आ. सौ. सुलभाताईंनी संबंधीतांना सुचना दिल्या.. दरम्यान महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन केल्यानंतर आमदार महोदयांनी पुतळा परिसरात सुरु असलेल्या सौंदर्यीकरण व सुशोभीकरणाच्या कामकाजाचा आढावा घेवुन सदरील काम सुध्दा शिघ्रतम पुर्ण करण्याविषयी सबंधीतांना निर्देश दिले.. आशीयाड चौक ते शेगांव परीसर प्रत्यक्ष पाहणी व आढावा दरम्यान आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता – एस. झेड. काझी, सहायक अभियंता – विनोद बोरसे, कंत्राटदार – जुझर सैफी, कैसर खालीद, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाचे सहायक अभियंता – शिवहरी कुलट, माजी नगररसेवक – प्रविण मेश्राम, अर्चना इंगोले, प्रमोद उर्फ राजाभाऊ सांगोले, ऍड . सुनिल बोळे, यश खो़डके, प्रशांत उर्फ गुड्डु धर्माळे, रविंद्र इंगोले, संकेत कुलट, रत्नदिप बागडे, पियुष वसु, सारंग देशमुख, पियुष झोड, लाला तिवारी, राजाभाऊ राजेंद्र लांडे, अरुण धर्माळे, आदिसहीत स्थानीय नागरीक प्रामुख्याने उपस्थित होते. शेगांव – रहांटगांव मार्गावरील सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम आता गतीने होत असल्याने नागरीकांना अवगमनाकरिता करीता सुविधा होणार असुन अपघात विरहीत रस्ता वाहतुकीचा मार्ग सुध्दा आता आमदार सौ.सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नामुळे सुकर व प्रशस्त झाला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here