मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण महोत्सवाला उपस्थित राहून ठाणेकर नागरिकांशी संवाद साधला

0
602

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण महोत्सवाला उपस्थित राहून ठाणेकर नागरिकांशी संवाद साधला

 

जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार
ठाणे : ठाणे शहरातील लोकमान्य नगर येथे माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्या वतीने लोकमान्य नगर, शास्त्री नगर विभागातील नागरिकांच्या कौटुंबिक मेळाव्याला तसेच सावरकर नगर परिसरात माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवाला मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून ठाणेकर नागरिकांशी संवाद साधला.

ठाणे शहराच्या प्रस्तावित क्लस्टर योजनेतून स्थानिक नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर येणार असून कोणालाही त्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर करून त्यांना हक्काचे घरकुल देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचे यासमयी स्पष्ट केले.

राज्यात सत्तेत आल्यानंतर ७२ मोठे निर्णय घेतले असून बंद पडलेले अनेक प्रकल्प वॉर रूमच्या माध्यमातून गती देऊन प्रगतीपथावर नेले आहेत. तसेच राज्यातील शेतकरी, कष्टकरी सर्वसामान्य माणसाला समोर ठेवून लोकाभिमुख सरकार चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करित असल्याचे याप्रसंगी बोलताना नमूद केले. अवघ्या तीन महिन्यांत या सरकारने केलेले काम बघता पायाखालची वाळू सरकल्यानेच मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून संभ्रम माजविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही मत यावेळी व्यक्त केले.

लोकमान्य नगर, शास्त्री नगर आणि सावरकर नगरवासीयांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या प्रश्नावर ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच तोडगा काढला जाईल अशी ग्वाही नागरिकांना दिली.

याप्रसंगी माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक योगेश जानकर, विभागप्रमुख एकनाथ भोईर, अमित लोटलीकर, विराज महामुणकर आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here