विरुर (स्टे) वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंतचा ९ वा बळी ; वनविभाग अजूनही झोपेतच

0
426

विरुर (स्टे) वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंतचा ९ वा बळी ; वनविभाग अजूनही झोपेतच

राजु झाडे

राजुरा तालुक्यातील विरुर वनपरिक्षेत्रात मागील 8 महिन्यापासून वाघाची दहशत चालू असून काल दि. 5 ऑक्टोबरला याच परिसरातील खांबाडा गावातील मोरोती पेंदोर या वक्तीचा बळी गेला असून हा आतापर्यंतचा ९ वा बळी आहे. या नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी कित्येकांकडून वारंवार वनविभागाला निवेदन देऊन वनविभागाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र अजूनही वनविभागाला या नरभक्षी वाघाला पकडण्यात यश आले नाही.

हा नरभक्षी वाघ आधी माणसाला ठार करत होता. मात्र आता या मृतकाची अवस्था बघितली असता. या वाघाने मृतकाचे 70 टक्के शरीराचे मास खाल्याचे आढळून आले आहे. सदर मृतक शेतकरी हा शेतात गुरे चारत होता. त्याचे शेत जंगलालगत आहे. शेतात गुरे चारत असताना वाघाने हल्ला केला . संध्याकाळी तो घरी परत न आल्याने गावातील लोकांनी शोधाशोध घेतला असता तो मृत अवस्थेत आढळून आला. अशा या हिंस्र नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी निवेदने सादर केले असून तसेच जर वनविभाग अपयशी असतील तर परिसरातील लोकांच्या हातात त्या वाघाला संपविण्यासाठी द्या ही मागणी केली होती. मात्र वनविभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. सदर वाघाला जेरबंद करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत वनविभागाकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र यात वनविभागाला यश न आल्याने परत मुदत वाढविण्यात आली आहे. मात्र काल झालेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे परत किती माणसांचे बळी गेल्यानंतर वनविभाग भानावर येईल असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून विचारला जात आहे.

परिसरात सर्वांकडे शेती हाच व्यवसाय असून आता सध्या कापूस वेचणीचा हंगाम चालू झाला आहे. कापसाच्या शेतीचे संरक्षण तसेच वेचणीचा हंगाम कसा करायचा हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अजूनही वनविभागाचे डोळे उघडले नाही. वनविभाग साखरझोपेत आहे. असे लोकांना वाटत असून लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वनविभागाला ही लाजिरवाणी बाब बनत चालली आहे. पण जनतेच्या प्रश्नाकडे वनविभागाचे कोणतेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. मात्र आता वनविभागाद्वारे तातडीने पाऊले उचलून त्वरित या हिंस्त्र नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात यावे, जर याकामी अपयश येत असेल ठार करा असा सूर आता परिसरातील जनतेतुन निघत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here