नगरपरिषद द्वारा लावल्या गेलेले मोरपंख झाले गायब- आम आदमी पार्टी

0
435

नगरपरिषद द्वारा लावल्या गेलेले मोरपंख झाले गायब- आम आदमी पार्टी

 

तालुका प्रतिनिधी/रोहन कळसकर
बल्लारपूर – आज दिनांक 19/10/2022 रोजी शहर संयोजक रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव ज्योति बाबरे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरात सौदर्यीकरणाच्या नावाखाली राज्यसरकरच्या विशेष निधीतून 36 लाख 76 हजार चे मोरपंख एकूण 200 मोरपंख वस्ती ते नगरपरिषद, पेपरमिल काटा गेट ते नगरपरिषद, FDCM ते नगरपरिषद लावण्यात आले होते. 200 मधून काही मेन्टेन्स साठी ठेवण्यात आले. परंतु आम आदमी पक्षाने हा मुद्दा उचलला तोच आठ ते दहा वेळा कंत्राटदाराकडून सुधारण्यात आले ब पुन्हा लावण्यात आले.

नगरपरिषद मधील संबंधीत अधिकाऱ्याकडून माहिती घेतल्यास त्यांनी सांगितले की मेंटेन करण्याचा खर्च खूप वाढत चालल्यामुळे आता ते मोरपंख बंद आहेत व मेन रोडवरील काढून टाकण्यात आले आहे. या सर्व माहितीतुन व लोकांशी संवाद केल्यानंतर असे दिसून आले की हा मोरपंख वर झालेला खर्च व्यर्थ आहे हे निदर्शनास येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here