दुचाकी व रानटी डुक्कराच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

0
1557

दुचाकी व रानटी डुक्कराच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू
● बल्लारपूर, कोठारी राष्ट्रीय महामार्गावरील घटना
● शिक्षकाचा मृत्यू तर शिक्षक पत्नी गंभीर जखमी

 

 

राज जुनघरे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी :- बल्लारपूर – कोठारी राष्ट्रीय महामार्गावर आज शनिवार रोजी जिल्हा परिषद शिक्षक बामणी येथुन पती – पत्नी सकाळी सात वाजता चे दरम्यान आपल्या कार्यरत असलेल्या कळमना , पळसगाव कर्तव्य बजावण्यासाठी जात असताना मौनफोर्ट कॉन्व्हेन्ट जवळ दुचाकीला रानटी डुकराने जबर धळक दिल्याने अपघात घडला. यात शिक्षक सुनिल पत्रु कोवे (४८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिक्षिका शालीनी सुनील कोवे (४४) या गंभीर जखमी झाल्या आहेत. सदर अपघाताचा तपास बल्लारपूर पोलीस व वन विभागाचे अधिकारी करित आहेत.
शनिवार या दिवशी शासनाच्या अधिसुचनेनुसार सकाळची शाळा असल्यामुळे नेहमी प्रमाणे बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असणारे शिक्षक सुनिल पत्रु कोवे (४८) व कळमना येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षिका शालीनी सुनील कोवे (४४) हे दोघे पती, पत्नी आपल्या दुचाकीवरून कर्तव्यावर सकाळी ७ वाजता बामणी येथील निवासस्थानावरुन निघाले असता बल्लारपूर – कोठारी राष्ट्रीय महामार्गावरील मौनफोर्ट कॉन्व्हेन्ट परिसरात अचानक रानटी डुकराने जबर धडक दिली. यात शिक्षक सुनिल कोवे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर पत्नी शालीनी कोवे हि गंभीर जखमी झाली. कर्तव्यावर जानारे सहकारी शिक्षक मागून येत असल्याने या गंभीर घटनेची दखल घेत लगेच बल्लारपूर पोलीस तथा रुग्णवाहिकेस तात्काळ पाचारण करण्यात आले. जखमी शिक्षिका शालीनी कोवे हिला डॉ. पोतदार हास्पिटल चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले असुन पोलिस पंचनाम्यानंतर शवविच्छेदनासाठी बल्लारपूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्काचे पत्नीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सदर दुर्घटना रानटी डुकरामुळे घळली असुन वनविभागाच्या बल्लारपूर वनाधिकारी यांना घटनेची माहिती दिली असता संबंधित अधिकारी व कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले. पुढील तपास बल्लारपूर पोलीस व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here