सिएसटीपीएस मधील कामगारांच्या मागण्या तातडीने पूर्ण करा अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा सूरज ठाकरे यांचा इशारा…

0
456

सिएसटीपीएस मधील कामगारांच्या मागण्या तातडीने पूर्ण करा अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा सूरज ठाकरे यांचा इशारा…

 

 

चंद्रपूर : कनवेअर बेल्ट या विभागातील कामगारांची काल दिनांक१३ ऑक्टोम्बर ला युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी बैठक घेतली. कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा करून कामगारांच्या समस्यांची तात्काळ दखल घेत याबाबत आज १४ ऑक्टोम्बर ला CSTPS व्यवस्थापनाला निवेदन देऊन तात्काळ या कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यास सांगितले. येत्या १ आठवड्यात कामगारांच्या समस्त मागण्या पूर्ण न झाल्यास CSTPS च्या गेट समोर समस्त कामगारांसह आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित यांनी सन 2018-19 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा चांदसुर्ला येथील शेतजमिनी विद्युत केंद्रामध्ये कोळसा वाहतूक करणाऱ्या पाईप कन्व्हेअर बेल्ट या कामाकरिता शेतकऱ्यांकडून हस्तांतरित करून घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे पारंपारिक उदरनिर्वाहाचे साधन त्यांच्यापासून कायमस्वरूपी दुरावले गेले. त्या बदल्यात फार कमी मोबदला शेतकऱ्यांना मिळाला. शेतकऱ्यांना स्थायी नोकरी देण्याचे आश्वासन कंपनीने केले होते. परंतु तसे न घडल्यामुळे 18 फेब्रुवारी 2022 रोजी तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना या संदर्भात तक्रार केली होती. व दहा दिवसांमध्ये कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कामावर सामावून न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. याची दखल घेत कंपनीने दोन बैठका लावल्या होत्या. पहिल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने दुसरी बैठक घेण्यात आली. दुसऱ्या बैठकीमध्ये कंपनी प्रशासनाने व कंपनीने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने लेखी स्वरूपी सर्व मागण्या मान्य केल्यानंतर देखील गेल्या दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून कुठलीही पूर्वसूचना न देता समस्त प्रकल्पग्रस्त कामगार तथा इतर कामगारांना देखील बेकायदेशीर रित्या कामावरून काढून टाकले आहे. कुठल्याही कामगाराला संपूर्ण काम सदर कंपनीने नियुक्त केलेले कंत्राटदार ही देत नसल्याची तक्रार सातत्याने प्राप्त होत आहे. मागे झालेल्या बैठकीत प्रत्येक कामगाराला 26 दिवस काम देऊ, असे कंपनी प्रशासनाने व कंत्राट दरातर्फे आलेल्या प्रतिनिधींनी मान्य केले असताना देखील अजून पर्यंत येथील कामगारांना न्याय मिळाला नाही. आज तर कामगारांना कामावरून काढून दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसाला कामगारांनी व त्यांच्या परिवारांची दिवाळी उपासमारीची व अंधारात करण्याचे पाप सदर कंपनी व कंत्राटदाराकडून जाणीवपूर्वक केले जात आहे. येत्या पाच दिवसांच्या आत सदर कंपनीने कामगारांच्या कायदेशीर मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही समस्त कामगारांसह कंपनी गेटच्या समोर आमरण उपोषणास बसू असा इशारा सुरज भाऊ ठाकरे यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here