तहसिल कार्यालय राजुरा येथील कार्यरत, तहसीलदार, श्री डाॅ रवींद्र होळी साहेब यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा च्या वतीने तहसील कार्यालय राजुरा येथे आयोजित करण्यात आला.

0
359

तालुका प्रतिनिधी राजुरा✍🏻 अमोलराऊत

 आज दिनांक ५/१०/२०२० रोजी तहसिल कार्यालय राजुरा येथील कार्यरत, तहसीलदार, श्री डाॅ रवींद्र होळी साहेब यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा च्या वतीने तहसील कार्यालय राजुरा येथे आयोजित करण्यात आला.  
कार्यक्रमा प्रसंगी अ. भा. आ. वि परीषद राजुरा चे तालुका अध्यक्ष श्री विनोद जि गेडाम साहेब, कार्याध्यक्ष अकुंशजि कुडमेथे साहेब, संघटक अमृतजि आत्राम साहेब, विश्वेशर मडावी साहेब, जिल्हा महासचिव महिपालजि मडावी साहेब, जिल्हा उपाध्यक्ष नितीन भाऊ सीडाम संतोष जि मेश्राम, रामटेके पटवारी, मगींच्या सरंपच मॅडम हे उपस्थित होते
प्रास्थाविक भाषणातून विनोदजि गेडाम साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर अंकुशजी कुडमेथे साहेब यांनी आपले विचार व अनुभव व्यक्त करुन होळी साहेबा विषयी त्यांचा कार्यानुभव मांडले, संचालन दिपक मडावी यांनी केले
समोरील वाटचालीसाठी भरभरुन शुभेच्छा देऊन शाल व श्रीफळ देऊन त्यांचा अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा च्या वतीने सन्मान करण्यात आला

दिपक मडावी
अ. भा. आ. वि परीषद राजुरा
तालुका सचिव

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here