बोरकर यांची प्रकृती खालावली, उपोषणाचा आज 6 वा दिवस

0
410

बोरकर यांची प्रकृती खालावली, उपोषणाचा आज 6 वा दिवस

बोरकरांचे प्रश्न जनहिताचे असून शासनाने त्वरित सोडवावे

माजी आमदार अँड.चटप यांची उपोषण मंडपाला भेट

शासन प्रशासनाकडून अजूनही दखल नाही

गडचांदूर/प्रवीण मेश्राम

“मदन बोरकर यांनी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन कंत्राट व त्यातील झालेला गैरव्यवहार,अनियमित व गैर कायदेशीरपना यासर्व समस्या सुटण्याकरीता सुरू केलेल्या उपोषणा निमीत्ताने उपस्थित केलेल्या मुद्दा जनहिताच्या दृष्टीने बरेच तथ्य असून या प्रश्नावर जनतेला न्याय मिळावा करीता शासन व जिल्ह्यातील प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हा प्रश्न व्यापक जनहित व सार्वजनिक निधी संबंधी असल्यामुळे तातडीने व अग्रक्रमाने सोडविण्यात यावा व उपोषण कर्त्यांना व जनतेला यथाशिघ्र न्याय मिळावा” असे मत राजूरा विधानसभेचे माजी आमदार अँड.वामनराव चटप यांनी मदन बोरकर यांच्या उपोषण मंडपाला भेटी दरम्यान व्यक्त केले.
गडचांदूर नगरपरिषदेत झालेल्या घनकचरा घोटाळ्याची शासनाने उच्चस्तरीय चौकशी करून अधिकारी,कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप करत प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी,दोषींवर कायदेशीर कारवाई तसेच कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा या मागणीच्या पूर्ततेसाठी “भीम आर्मी” जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी 30 सप्टेंबर पासून गडचांदूर नगरपरिषदपुढे अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे.उपोषणाचा आज 6 वा दिवस लोटूनही शासन प्रशासनाने याची समाधानकारक दखल घेतलेली नाही.बोरकर यांची प्रकृती खालावली असून अनेकांनी उपोषण मंडपाला भेट देऊन समर्थन जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here