श्री माता महाकाली नगर प्रदक्षिणा भव्य शोभायात्रेला सुरवात

0
395

श्री माता महाकाली नगर प्रदक्षिणा भव्य शोभायात्रेला सुरवात

माता महाकाली महोत्सवा निमित्त आयोजित शोभायात्रेला सुरवात झाली असुन माता महाकाली मातेच्या पुजना नंतर सदर शोभायात्रा अंचलेश्वर गेटच्या मार्गाने मार्गस्त झाली आहे. यात चंद्रपूरातील नागरिकही बहुसंख्येने सहभागी झाले आहे.

या भव्य नगर प्रदक्षिणा पालखी शोभायात्रेत हर हर शंभु गाण्याची सुप्रसिध्द गायीका अभिलिप्सा पांडा यांचा रोड शो असणार आहे. सोबतच 13 अश्व, अश्व आरुढ नवदुर्गांचे बोलके दृष्य, अश्व आरुढ राणी हिराईचे बोलके दृष्य, श्री. माता महाकालीची चांदीची मूर्ती व पादुका, पालखीत अब्दागीरी व तूतारी, पोतराजे नृत्य, प्रधानमंत्री आणि उपराष्ट्रपती यांच्या कार्यक्रमात वादन करणारे राज्यातील प्रथम क्रमांकाचे 111 कलाकारांचे शिवगर्जना ढोल ताशा व ध्वज पथक, अश्वावर देवी देवतांचे साकारलेले बोलके दृष्य, नागपूर, चंद्रपूर, राजुरा येथील तिन ढोल ताशा पथक, दोन बॅंड पथक, गायत्री परिवाराचा 100 महिलांचा कळस समुह, 100 शंखनाथ महिलांचा समुह, १५० लोकांचे पाच लेझीम पथक, 100 महिलांचे ध्वजधारी पथक, 3 ध्वनी वादक पथक, पवनसुत प्रभु श्री बाहुबली हनुमान यांचे बोलके दृष्य, पुरुष ध् महिला दांडीया समुह, योग्य नृत्य परिवारातील १००१ पुरुष महिलांचे योग नृत्य, 4 आदिवासी नृत्य, 1 लैंगी बंजारा समाज नृत्य, 100 मुला ध् मुलींचे कराटे प्रात्याक्षिक दृष्य, 80 वादकांसह जगदंब ढोल पथक, शिवाज्ञा वाद्य पथक यांच्यासह इतर धार्मीक सांस्कृतीक आणि सामाजिक देखाव्यांचा सहभागी झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here