हाथरस येथील घटणेच्या निषेधार्थ यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने निदर्शने

0
358

हाथरस येथील घटणेच्या निषेधार्थ यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने निदर्शने

आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

हाथरस येथील कृर घटणेच्या निषेधार्थ यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची प्रामूख्याने उपस्थिती होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना फाशी देण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, सामाजिक कार्यकर्त्या शाहीन शेख, युवती प्रमूख भाग्यश्रीहांडे, विमल काटकर, वैशाली मेश्राम, वैशाली रामटेके, कल्पना शिंदे, दुर्गा वैरागडे, शहर संघटक, कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष अजय दुर्गे, सलीम शेख, विनोद अनंतवार, शहर संघटक राहुल मोहूर्ले, राम जंगम, देवा कुंटा आदि पदाधिका-यांची उपस्थिती होती.

निर्भया प्रकरणानंतर कठोर कायदे करुनही देशभरात महिला अत्याचारांच्या घटणांमध्ये कमी आलेली नाही. त्यातच आता उत्तर प्रदेश सरकारने अत्याचार पिढीतेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. १४ सप्टेंबर रोजी चार जणांनी केलेल्या बलात्कारात पिढीतेला भयंकर गंभीर दुखापती झाल्या होत्या. परंतु, पोलिसांनी पाच दिवसांपर्यंत तिची तक्रार नोंदवून घेतली नाही. तिला ताबडतोब वैद्यकीय मदत मिळाली असती तर तिचा जीव वाचला असता पण, ती देखील नाकारली गेली. तिच्यावर रीतसर अंत्यसंस्कार करण्याचा हक्कसुध्दा तिच्या कुटुंबियांना नाकारत पोलिसांनी तिच्या मृत शरिराचे परस्पर दहन केले. या दुर्दैवी घटणेचे पडसाद संपूर्ण देशात उमटत असून पिढीतेला न्याय देण्यासाठी देशभरात आंदोलन केल्या जात आहे. चंद्रपूरातही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आज शनिवारी शहरातील गांधी चौकात सदर घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केलेत. बलात्काराची बळी असलेली युवती व तिच्या कुटुंबाला भाजपच्या सरकारने निर्लज्जपणे न्याय नाकारण्याच्या कृत्याचाही यावेळी धिक्कार करण्यात आला. निदर्शना दरम्याण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत घटणेचा निषेध नोंदविण्यात आला. फाशी द्या, फाशी द्या आरोपींना फाशी द्या, योगी सरकारचा निषेध असो, पिढीतेला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी घोषणांची फलक हातात घेउन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घटनेचा निषेध करण्यात आला असून आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे बबलू मेश्राम, मुन्ना जोगी, प्रकाश काळे, वृषभ परचाके, चंदा वैरागडे, चंदा ईटनकर, कौसर खान, नंदा पंधरे, संगीता कार्लेकर, स्मिता वैद्य, अनिता झाडे, आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here