उपविभागीय अधिकारी चिमूर यांचे मार्फत दिले निवेदन
हाथरस अत्याचार प्रकरण

हाथरस (उत्तर प्रदेश) सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी ची शिक्षा देण्यात यावी.
उत्तर प्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील 19 वर्षीय पीडित मुलीवर 14 सप्टेंबरला सामूहिक बलात्कार झाला होता. यात पुढे तीची जीभ कापली तसेच मणक्याचे हाडदेखील मोडण्यात आले. बलात्काराच्या घटनेनंतर नऊ दिवसांनी पीडित मुलगी शुद्धीवर आली होती, तिच्यावर दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र ती वाचू शकली नाही. अखेर तिचा मंगळवार दिनांक 29 /9 /2020 रोजी सकाळी मृत्यू झाला यातील सर्व नराधम आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच पीडित मुलीचा शव अंत्यविधी साठी घरच्याला न देता पोलिसांनी स्वतः अंत्यविधी केला आणि सर्व पुरावे नष्ट करायचा प्रयत्न पोलिसांनी केला. अशा सर्व पोलिसांना तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका चिमूर चे तालुका अध्यक्ष स्नेहदिप खोब्रागडे, तालुका संघटक प्रा.नागदेवते, सम्यक विद्यार्थी आंदोलन चिमूरचे तालुकाध्यक्ष शुभम मंडपे, शैलेशजी गायकवाड (सर्कल प्रमुख जि.प.शंकरपूर-डोमा), शालीकजी थुल, गेडाम, श्रीदास राऊत, सिद्धार्थ शंभरकर, महिला पदाधिकारी गेडाम ताई तसेच वंचित बहुजन आघाडी तालुका चिमूरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.