‘राहुल गांधींना धक्काबुक्की’ ; स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे तालुका महाप्रमुख वैभव फुके यांनी या घटनेचा जाहिर निषेध करत उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट सुरू करण्याची केली मागणी!
प्रतिनिधी देवेंद्र भोंडे

अमरावती / मोर्शी : हाथरस येथील सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी पायी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव फुके यांनी तीव्र निषेध केला आहे.
‘यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे,’ असं वैभव फुके यांनी म्हटलं आहे. ‘कुठल्याही राज्याचं प्रशासन असू दे बलात्कारासारखी लाजिरवाणी घटना घडल्यावर प्रशासनाने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे. ती व्हावी या मागणीसाठी राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते. राहुल गांधी हे संसदेचे सदस्य आहेत. त्यांच्याशी असं वर्तन केलं जाणार असेल, यूपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा जाहीर निषेध स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे वैभव फुके यांनी येवेळी केला.
न्याय्य मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या किंवा एखाद्याच्या भेटीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधीची वा कुठल्याही व्यक्तीची पोलिसांनी कॉलर धरणं कितपत योग्य आहे, असा सवाल वैभव फुके यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे.
उत्तरप्रदेशच्या हाथरस मधील या १९ वर्षीय तरुणीवर गावतीलचं उच्चजातीच्या ४ नाराधमांकडून सामूहिक बलात्कार केला जातो. तिला जनावरां सारखी मारहाण केली जाते. तिच्याकडून कोणताही कबुली जबाब मिळू नये म्हणून तिची जीभ कापली जाते. यानंतर ती हॉस्पिटलमध्ये मृत्यू सोबत झुंज करते. कुणाच्याही कानापर्यंत तिच्यावरील अमानुषपणे झालेल्या अत्याचारांचा, किंकळण्याचा,ओरडण्याचा आवाज या मुर्दाड व बहिऱ्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहचतांना दिसत नाही म्हणून उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे तालुका महा.प्रमुख वैभव फुके यांनी केली आहे.