आम आदमी पार्टी बल्लारपूर ची शहरात “आम सभे” च्या माध्यमातून जनजागृती

0
343

आम आदमी पार्टी बल्लारपूर ची शहरात “आम सभे” च्या माध्यमातून जनजागृती

तालुका प्रतिनिधी/रोहन कळसकर
बल्लारपूर : आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली व शहर प्रभारी प्रा. नागेश्वर गंडलेवार यांच्या मार्गदर्शनाने, “जन जागृती मोहीम” बस्ती विभागात, जोखू नाल्याजवळ, कृष्ण मंदिर मैदान, बल्लारपूर, जिल्हा – चंद्रपूर, महाराष्ट्र येथे “आम सभा” मार्फत सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून योग्य निवडणूक प्रश्न आणि अधिकार लोकांपर्यंत पोहोचावेत. उमेदवार कसा असावा, बल्लारपूर शहरातील जनतेला कोणत्या सुविधा दिल्या पाहिजेत, शिक्षण आणि आरोग्य सुविधांचे सर्वसामान्यांच्या जीवनात काय महत्त्व आहे, अशा महत्त्वाच्या विषयांवर जनतेचे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

दिल्ली मॉडेलच्या धर्तीवर बल्लारपूर शहरात एकवेळ “आप”साठी संधी शोधली जात आहे. बल्लारपूर शहरातील सर्वसामान्य जनताही शेकडोच्या गर्दीत येऊन उदंड प्रतिसाद देताना दिसत आहे. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांच्या बाजूने माणसे दाखल होत आहेत, तुमचे अनमोल मत आता कामाला लागेल, असे म्हणत आहेत.

‘आप’ बल्लारपूर शहराचे कार्यकर्ते, मार्गदर्शक, समर्थक व पदाधिकारी अथक परिश्रम करून अशा कार्यांना यशस्वी आकार देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here