अपंग व वयोव्रुद्ध सेवानिवृत्त शासकीय कर्मचार्यास योग्य न्यायासाठी करावी लागत आहे वणवण….

0
366

मुंबई प्रतिनिधी (महेश कदम)

ओझर येथील एक अपंग सेवानिवृत्त व शासकीय कर्मचारी श्री.ज्ञानेश्वर दादाभाऊ शेळके (वय ७२) यांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ६ व्या वेतन आयोगाचा फरक अद्याप मिळालेला नाही .

साधारणतः २१ मे २०१९ रोजी त्यांना ६ व्या वेतन आयोगाचे मंजुरी पत्रक मिळाले. त्यांच्या बरोबरच्या सेवानिवृत्त सहकारी कर्मचार्‍यांना मंजूरीपत्रक मिळून ६ व्या वेतन आयोगाचा फरकही मिळाला.

परंतु श्री.ज्ञानेश्वर शेळके यांना मंजूरी पत्रक येऊन जवळजवळ दिड वर्षे झाली आहे परंतु त्यांना त्यांचा फरक अद्याप मिळालेला नाही.

लाँकडाउनच्या अगोदर त्यांनी पुणे येथील ट्रेझरी आँफीसमध्ये वेळोवेळी चकरा मारल्या, परंतु येथील स्टाफने त्यांच्या वयाचा, लांबच्या प्रवासाचा विचार न करता, मदतीचा हात न देता त्यांना वेळोवेळी उडवा-उडवीची उत्तरे दिली.

सदर व्यक्ती हि अपंग, वयोव्रुद्ध असल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कार्येल्यात सारखे वणवण करावी लागत आहे, अशा परिस्थितीत या शासकीय कर्मचारीस योग्य न्याय कधी मिळणार असे प्रश्न निर्माण झाले आहे.

निश्चितपणे शासन या विषयाशी संबंधित अधिकारी वर्ग यामध्ये लक्ष घालून या अपंग व वयोव्रुद्ध शासकीय कर्मचार्यास योग्य न्याय लवकरात लवकर मिळवून देतील अशी अपेक्षा श्री.ज्ञानेश्वर शेळके करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here