माथा फाटा कुसळ रस्त्यावरील अपघाताला आमंत्रण देणारा खड्डा बुजवा

0
387

माथा फाटा कुसळ रस्त्यावरील अपघाताला आमंत्रण देणारा खड्डा बुजवा

 

 

कोरपना/प्रतिनिधी : कोरपणा तालुक्यातील जिवती कडे जाणारा कुसळ धानोली धनकदेवी हा रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेतून तयार करण्यात आला. या रस्त्यावरील माथाफाटा येथे भ्रमणध्वनी टावर काम यावर्षी करण्यात आले. टावर पूर्ण उभे झाले असून टावर कामाकरिता कंत्राट दाराने रस्ता खोदून त्या ठिकाणी अपघाताला आमंत्रण देणारे खड्डा झाल्यामुळे अनेक वाहन चालकांना या ठिकाणी पडझड दुखापत व अपघात होत आहे.

प्रधानमंत्री सडक योजनेच्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे त्या ठिकाणी सिमेंट खांब व वायरिंग चे काम शेतकऱ्यांनी केले. त्यामुळे दोन वाहन त्या ठिकाणावरून जात नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली असून कंत्राटदाराच्या दुर्लक्षपणामुळे वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला आहे. तसेच शेतकऱ्यांनी सीमा सोडून रस्त्यावर सिमेंट खांब तारेचे कुंपण घालून अतिक्रमण केल्यामुळे या वरदडी च्या मार्गावर वाहतुकीला त्रास होत आहे संबंधित विभागाने अनाधिकृत अतिक्रमण तातडीने काढून रस्त्यावर विनापरवानगीने खड्डे खोदून रस्ता नास घुस केल्याबद्दल कारवाई करावी. तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here