जेसीआय राजुरा रॉयल्स द्वारा आदर्श शिक्षकांचा सत्कार. – शिक्षक हे आदर्श पिढीचे निर्माते. – डॉ. संभाजी वरकड

0
456

जेसीआय राजुरा रॉयल्स द्वारा आदर्श शिक्षकांचा सत्कार.
– शिक्षक हे आदर्श पिढीचे निर्माते. – डॉ. संभाजी वरकड

राजुरा 26 सप्टेंबर

सामाजिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर कार्य करणारी संस्था जेसीआई राजुरा रॉयल्स द्वारा वर्षभरामध्ये विविध उल्लेखनीय कार्यक्रम घेण्यात येत आहे. लॉक डाउन च्या काळातही इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार , विविध कोरोना योद्धांचे सत्कार, डॉक्टरचे व नर्सेस चे सत्कार, मास्क , सॅनिटायझर व हँडवॉश चे वितरण, पोलीस व शेतकऱ्यांचे सत्कार, प्लास्टिक निर्मूलन उपक्रम, पाणी वाचवा उपक्रम ,विविध मोफत ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम ,
कौशल्य विकास उपक्रम, असे अनेक अभिनव उपक्रम जेसीआय राजुरा रॉयल्सचे निरंतर सुरू आहे.
नुकताच सप्टेंबर महिन्यात आदर्श शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्याचा विचार जेसीआय राजूरा रॉयल्स च्या अध्यक्षा जेसी सुषमा शुक्ला यांच्या मनात आले.
24 सप्टेंबर ला गुरुकुल एक्यडमी राजुरा येथे विविध शैक्षणिक ,सामाजिक व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेसीआय राजुरा रॉयल्स च्या अध्यक्षा जेसी सुष्मा शुक्ला , प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ता म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी वरकड , तसेच बक्षीस वितरक म्हणून संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश यादवराव धोटे उपस्थित होते. हा कार्यक्रम विहीरगांव चे युवा उपसरपंच इरशाद वाहीद शेख , जिल्हा परिषद हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक गजानन चौव्हान व स्वर्गीय श्यामा कृष्णदत्त शुक्ला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ के.जे.शुक्ला यांच्या सौजन्याने घेण्यात आला.
या कार्यक्रमात राजुरा तालुक्यातील विविध कलागुण संपन्न शैक्षणिक ,सामाजिक ,सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अनेक शिक्षकांचे सत्कार स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी प्राचार्य वरकड यांनी आदर्श शिक्षक म्हणून सत्कारमूर्ति म्हणून निवड झालेल्या शिक्षकाप्रति आनंद व्यक्त करीत समाधान मानले तसेच ही निवड अतिशय योग्य असून शिक्षक हे आदर्श पिढी निर्माते असून प्रत्येक व्यक्तीला एका गुरुचे मार्गदर्शन अतिशय आवश्यक असते असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कारमूर्ती संदीप कोंडेकर,जि.प. उच्च प्राथमिक शाळा चनाखा,
इरफान शेख ,जि. प.उच्च प्राथमिक शाळा धानोरा, रामरतन चापले , जि.प. उच्च प्राथमिक शाळा नलफडी,मनीष मंगरूळकर, जि.प.उच्च प्राथमिक शाळा, मूर्ती,जाकीर अली सय्यद
एकलव्य रेसिडेंशियल मॉडेल स्कूल ,देवाडा ,आनंद चलाख , शिवाजी हाईस्कूल गोवरी,बाबा कोडापे , जि.प.उच्च प्राथमिक शाळा शेणगाव, बादल बेले ,आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, राजुरा, संगीता मूलकलवार प्रोग्राम कॉर्डिनेटर व शिक्षण प्रेमी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन ,उपरवाही, कृतिका सोनटक्के ,शिवाजी हायस्कूल राजुरा, वैशाली विजय भोयर ,
जि. प. उच्च प्राथमिक शाळा सुमठाणा , चंद्रप्रकाश बुटले,
जिल्हा परिषद हायस्कूल, राजुरा, रूपा बोरेकर ,प्राचार्य
एकलव्य रेसिडेंशियल मॉडेल स्कूल ,देवाडा , तृप्ती विकास मेंडूलकर , जि.प. उच्च प्राथमिक शाळा ,पंचाळा, नरेश बोभाटे ,
माझी मुख्याध्यापक
जि.प.हायस्कूल ,विहीरगाव,
गणेश लोहे, मुख्याध्यापक ,साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय
विशेष सत्कारमूर्ती ,मेहमूद शेख उर्फ पाशा शेख , नॅशनल ॲथलेटिक्स व क्रीडा प्रशिक्षक राजुरा , सुशीला सत्यनारायण पोरेड्डीवार , जि. प.उच्च प्राथमिक शाळा ,आक्सापुर यांचा प्रामुख्याने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन सुशीला पुरेड्डीवार यांनी तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन जि.प. हायस्कूल, कान्हाळगाव चे शिक्षक स्वतंत्र कुमार शुक्ला यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा बोढे ,सुशीला पुरेड्डीवार व इतर सदस्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here