गडचांदूरात अस्वच्छतेने डेंग्यू हा आजार वाढण्याची शक्यता
न.प.शासनप्रशासन विरूद्ध नागरिकात संतापाची लाट.
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

गडचांदूर शहरात महिन्या भरात डेंग्यूने चार निष्पाप नागरिकांचे बळी घेतले तर कित्येक आजारी आहे.काही भाग वगळता बऱ्याच ठिकाणी नाली सफाई होत नसल्याने साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे. किटकनाशक फवारणी होत नसल्याने नागरिकांमध्ये स्थानिक नगरपरिषदेच्या कारभारांविषयी संतापाची लाट पसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.कोरोनापेक्षा डेंग्यू-मलेरियाचे संकट मोठे अशी भावना व्यक्त होत आहे.नाली नसल्याने घरासमोरच्या पटांगणात व बोअरवेल जवळ घाण पाण्याचे डबके साचले असून डेंग्यू आजाराची भीती निर्माण झाली आहे.
प्रभाग क्रमांक एक मध्ये नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह सत्ताधारी एक आणि विरोधी एक,असे तीन प्रतिनिधींचे निवासस्थान आहे.एकाच्या घरा शेजारीच चक्क कचऱ्याचे ढीगार पडून असल्याचे चित्र होते.डुकरांचा हैदोस पहायला मिळत असून वास्तविक पाहता शहरात बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता कायम आहे.प्रभाग क्रमांक एक येथील साईगृह निर्माण सोसायटी(झंझाड सर)यांच्या घरा समोरील पटांगणात व बोअरवेल जवळ सांडपाणी साचून राहत असल्याने परिसरात डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढला आहे.गेल्या कित्येक महिन्यापासून सदर समस्या मार्गी लावण्याचा तगादा सुरू असून आजपर्यंत याविषयी काहीच सकारात्मक घडले नाही अशी खंत व्यक्त करत साचलेला सांडपाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा, लवकरात लवकर नालीची निर्मिती करावी आशी मागणी या सोसायटीतील रहिवासी प्रा.काळे,प्रा.माहूरे,परसुटकर सर आणि किराणा अध्यक्ष तथा व्यापारी असोसिएशनचे सचिव प्रशांत गोरशेट्टवार यांच्या सह इतरांनी न.प.शासनप्रशासनाकडे केली आहे.