*डॉ प्रवीण लोंनगाडगे यांची नाहक बदनामी* *कोरोना झाला म्हणून समाज कंटाकडून अपप्रचार* *रुग्णांशी भांडण झाली असल्याची अफवा खोटी डॉ लोंनगाडगे यांचे स्पष्टीकरण*
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
गडचांदूर येथील गणपतीक्लिनिक चे नामवंत डॉक्टर डॉ प्रवीण लोंनगाडगे हे गल्या 15 ते 17 वर्षांपासून डॉक्टर कीचा व्यवसाय करीत आहे .त्यांच्या बोलण्यावरच अर्धा रुग्ण बरा होतोय अशे रुग्णाचे व रुग्णाच्या नातेवाईकांचे मत आहे. शांत संयमी व नेहमी रुग्णांशी हसत बोलणारे व रुग्णांना आपलेसे वाटणारे डॉ लोंनगाडगे हे गडचांदूर शहरातील एक आहे. अश्यातच काही दिवसांपासून त्यांची नाहक बदनामी व खोटी माहिती समजा पुढे जात आहे .त्यांना कोरोना झाला, त्यांचा रुग्णाच्या नातेवाईकांशी भांडण झाले अशी अफवा समजा पुढे पसरत आहे .

त्यातून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास होत आहे तर बरेच जणांचे त्यांना फोन येत आहे सोबतच याची माहिती त्यांच्या पत्नीला, व क्लिनिक च्या सिस्टरला ला सुद्धा फोन करून विचारणा करत आहे त्यामुळे त्यांना नाहक त्रासाला समोर जावे लागत आहे .
प्रतिनिधींनी डॉ लोंनगाडगे यांची भेट घेतली असता मला सतत चार पाच दिवसापासून बरेच फोन आले की तुमच्या दवाखान्यात रुग्णा सोबत भांड़ण झाले आहे. हि निव्वळ अफवा असून यावर विश्वास ठेवू नका. सोबत काही लोकांनी मला कारोना झाला आहे अशी सुद्धा अफवा पसरवून उगाच सर्वसामान्यांपर्यंत गैरसमज पसरवण्यात आला. कृपया अश्या अफवांना बळी पडु नका दवाखाना सर्वसामान्य वेळेत सुरू आहे*