अतिवृष्टीचा बळी ठरला जुनगाव येथील भाऊजी गेडाम, शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी….

0
510

अतिवृष्टीचा बळी ठरला जुनगाव येथील भाऊजी गेडाम, शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी….

 

पोंभुर्णा : प्रतिनिधी
शुक्रवारपासून पोंभुर्णा तालुक्यात धुवाधार बरसात सुरू आहे. शेतकऱ्यांना काही प्रमाणात पावसाने दिलासा दिला असला तरी या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

अशातच आज दिनांक 12 जुलै रोजी सुदृढ असताना बाथरूमला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर काळाने झडप घातली. भाऊजी विठूजी गेडाम वय अंदाजे 65 वर्ष यांचा आज सकाळी साडेआठ वाजता चे दरम्यान मृत्यू झाला असून कुटुंबीय सैरभैर झाले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित कुटुंबीयांना मदत जाहीर करून सांत्वना द्यावी अशी मागणी गाववासीयांनी यांनी केली आहे.

भाऊजी गेडाम हे पत्रकार तथा शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांचे लहान वडील आहेत. जीवनदास गेडाम यांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक असतानाच त्यांच्यावर दुसरा आघात झालेला आहे. त्यामुळे या संपूर्ण कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here