गंगा सृष्टी संगमनेर येथे आषाढी निमित्त विविध उपक्रमांचे नियोजन….

0
574

गंगा सृष्टी संगमनेर येथे आषाढी निमित्त विविध उपक्रमांचे नियोजन….

 

अहमदनगर
संगमनेर दिनांक 12/7/2022
(प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गायकर पाटील)

 

आषाढी एकादशी निमित्त संगमनेर येथील गंगा सृष्टी सांस्कृतिक मंडळ व गंगा सृष्टी परिवाराच्या वतीने विविध प्रकारच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. या उपक्रमांचे नियोजन सांस्कृतिक विभाग महिला मंडळ द्वारा करण्यात आले होते. संगमनेर नगरपालिका च्या माजी नगराध्यक्ष सौ.अंजली उर्फ दुर्गा तांबे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
पंढरपूर आणि वारकरी सांप्रदाय या बाबत अधिक माहिती व्हावी म्हणून लहान मुले, महिला यांना विशेष माहितीपट ही या वेळी दाखवण्यात आला. लहान मुले, महिला, पुरुष सर्वच वारकरी वेषेत दिसले तेव्हा गंगा सृष्टी मध्ये मोठे भाविक वातावरण निर्माण झाले होते ,तर याच ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी यांचे ही विशेष पूजन महा आरती सौ. दूर्गाताई तांबे, सह अन्य महिलांनी केले, विविध प्रकारच्या कलागुणांचे या वेळी सादिरिकरण करण्यात आले होते , लहान चिमुकल्यांचे विविध गुण दर्शन कार्यक्रम पार पाडल्या नंतर विशेष दिंडी चे नियोजन , गोल रिंगण , फुगड्या आदी खेळ महिला, मुले, पुरुष सहभाग नोंदवत पार पडले. प्रमुख विजेत्यांना या वेळी सौ. दुर्गताई तांबे यांच्या हस्ते पारितोषक देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.शुभांगी गुंजाळ, रुपाली शिंदे, रीना गुंजाळ , रुपाली गुंजाळ,सौ.सायली गुंजाळ सौ.गाडेकर , सौ . नंदा गायकर , सौ.देशमुख , सौ.कोल्हे , सौ खताळ आदी महिलांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाची सांगता विशेष अल्पोहार ने करण्यात आली. सांस्कृतिक मंडळाच्या वतीने या वेळी सर्वांचे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here