प्रलंबित विकास कामे व नागरिकांच्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडवा

0
446

प्रलंबित विकास कामे व नागरिकांच्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडवा

आ. विजय वडेट्टीवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

सिंदेवाही येथे विकास कामांबाबत आढावा बैठक संपन्न

 

 

शहरी व ग्रामीण नागरिकांच्या मूलभूत सुविधा व गरजा लक्षात घेता सत्ता काळात ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही तालुक्यात कोट्यावधींच्या विकास कामांसाठी निधी मंजूर केला. मंजूर विकास आराखड्यातील प्रलंबित विकास कामे तसेच ग्रामीण व शहरी नागरिकांच्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडवा असे निर्देश राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी सिंदेवाही येथील विश्रामगृहात आज पार पडलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

 

आयोजित आढावा बैठकीस प्रामुख्याने सा.बा. उपविभागाचे उपविभागीय अभियंता माधवराव गावाळ , नगरपंचायत मुख्याधिकारी सुप्रिया राठोड, सा.बा .उपविभागाचे शाखा अभियंता वानखेडे, राठोड, चांदेकर, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.झाडे, संवर्ग विकास अधिकारी सातरे, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे काँग्रेस कमेटी तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे , प्रामुख्याने उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, सिंदेवाही शहराच्या विशेष सौंदर्यकरण व प्रभाग अंतर्गत नाल्या तथा सिमेंट रस्ते याकरिता शासन स्तरावरून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला. तर शहराला गेल्या वर्षानुवर्षापासून भेडसावणारी पाणीपुरवठा समस्या सोडविण्यासाठी तसेच नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा व्हावा या उदांत हेतूने नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 59 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून दिला.तसेच शहरातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व चौक सौंदर्यकरण तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा याकरिता विशेष असा निधी दिला आहे. ही सर्व कामे तातडीने सुरू करण्याकरिता येणाऱ्या तांत्रिक अडचणी ह्या जलद गतीने दूर करून तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या यात ग्रामीण स्तरावरील अनेक पोच मार्गावरील पूल तसेच विकास कामे करताना अर्धवट राहिलेली कामे यामुळे दळणवळण व वाहतुकी दरम्यान निर्माण होणारी समस्या प्राधान्य क्रमाने सोडवून तालुक्यातील जनतेच्या समस्यांचे निराकरण करावे असे स्पष्ट निर्देश सदर बैठकीत देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी माजी कॅबिनेट मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांचे निर्देशाचे पालन करीत समस्या तातडीने सोडविण्यात येणार अशी ग्वाही दिली.

 

 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अडचणींचा त्वरित निपटारा करा – आ. वडेट्टीवार

आज सिंदेवाही येथील विश्रामगृहात आढावा बैठक सुरू असताना तालुक्यातील पेटगाव व मोहाडी येथील काही कार्यकर्ते यांनी आमदार वडेट्टीवार यांची भेट घेऊन परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींची आपबीती कथन केली. यावर आ. वडेट्टीवार यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये व समस्यांवर ताबडतोब तोडगा काढा अशी तंबी देखील दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here