आंबोली-आसोला मार्गावर खड्ड्यांमध्ये बेसरमची झाडे लावुन आंबोली-आसोला गावकऱ्यांकडून शुभम मंडपे यांच्या नेतृत्वात आंदोलन

0
343

आंबोली-आसोला मार्गावर खड्ड्यांमध्ये बेसरमची झाडे लावुन आंबोली-आसोला गावकऱ्यांकडून शुभम मंडपे यांच्या नेतृत्वात आंदोलन

पोलीस सहाय्यक निरीक्षकांमार्फत निवेदन सादर

विकास खोब्रागडे

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील आंबोली-आसोला मार्गावर खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे हे खड्डे शेतकऱ्यानां व शेतमजुरांना व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना अपघातास आमंत्रण देत आहे व मागील महिनाभरापासून या ठिकाणी अनेक अपघातही झालेले आहेत व अनेक शेतकऱ्यांच्या बैलगाड्या त्या ठिकाणी फसलेल्या आहेत व या मार्गाने असोला आंबोली चिंचाळा लावारी बोरगाव वाकर्ला येने जाणे करीत असतात या खड्यांवर उपाययोजना करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय चिमुर यांना निवेदनाच्या माध्यमातून कळविले होते व तीन दिवसांची मुदत देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही व त्याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांच्या नेतृत्वामध्ये आंबोली आसोला मार्गावर खड्यांमध्ये बेशरम (मैदीच्या) झाडे लावून आंदोलन करण्यात आले व पोलीस सहाय्यक निरीक्षक पोलीस दुरक्षेत्र शंकरपूर यांच्या मार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर व सार्वजनिक बांधकाम विभाग चिमुर यांना निवेदन पाठविण्यात आले व हे आंदोलन शांततेमध्ये सोशल डिस्टन चा वापर करून व मास्क चा वापर करून आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलन करतांना सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे उपस्तीत होते व परिसरातील शेतकरी , सुरेश गरमडे कांशीरामजी चौरे मधूकरजी नागपुरे मुरलीधरजी चुनारकर सुधाकरजी राऊत चिंचाळा नंदू ठाकरे पंकज चन्ने असोला निकेश खंडसंग आसोला विजय माथने प्रमोद भसारकर ,राकेश गायकवाड , संजय लाकडे भोजराज गायकवाड वसंता चौरे उपस्तीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here