अन…’ती’ पाणपोई ठरली वाटसरूंना वरदान

0
496

अन…’ती’ पाणपोई ठरली वाटसरूंना वरदान

सरपंच प्रशांत कोल्हे यांचा उपक्रम

 

 

आशिष गजभिये
चिमूर

पाणी” हा सजीवसृष्टी व निसर्ग समतोलाचा अविभाज्य घटक याच पाण्यासाठी पूर्वीच्या काळात बाबासाहेब आंबेडकर यांना महाड येथील चवदार तळ्यावर सत्याग्रह करावा लागला होता. “तहानलेल्या पाणी देणे हा धर्म आहे!” अशी म्हण पूर्वीच्या काळापासून प्रख्यात आहे पण आता हे चित्र बदललं आणि सामाजिक बांधिलकीचा काही अपवाद वगळता सर्वांना विसर पडत असतांनाच सद्याच चित्र आहे.पूर्वीच्या काळात उन्हाळ्याच्या काळात हॉटेल -पानटपरी व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते वाटसरूंना पिण्याचे पाणी म्हणून सामाजिक बांधलकी जोपासत थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून घ्यायचे पण आता हे चित्र बदललं आहे.आता मात्र पिण्याच्या पाण्याचा बाटलीबंद व्यवसाय सुरू झाल्याने एरवी सर्वत्र थंड पाण्याचे असणारे राजन(मडके) कुठेही दिसत नाही साधं पाणी पिण्याची आता किंमत मोजावी लागत आहे.

 

चिमूर तालुक्यातील खडसंगी हे गाव परिसरातील गावांचे व सर्वसामान्य नागरिकांची लोकवाहिनी असलेल्या लालपरीचे व जलद गाड्यांचे बसस्थानक! दळणवळण करण्याच्या या ठिकाणावरून दररोज हजारो वाहनांची वाहतूक व हजारो नागरिकांचा प्रवास होतो.शासन- प्रशासनच्या उदासीनतेमुळे येथील प्रवाश्यांना बसस्थानकाच्या डबघाईमुळे हॉटेल-पानटपरी व्यावसायिकांच्या उधार आसरा घ्यावा लागतो.पिण्याच्या पाण्यासाठी तर चक्क बाटलीबंद पाण्याचे पैसे मोजावे लागतात.हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही.ही बाब लक्षात घेत वहाणगाव(बोथली) ग्रामपंचायतचे सरपंच प्रशांत कोल्हे यांनी भारतरत्न डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत खडसंगी येथील बसस्थानकाच्या परिसरात शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली या त्यांच्या सुविधेमुळे तप्त उन्हात प्रवास करणाऱ्या वाटसरूंना दिलासा उपलब्ध होतो.ऐवरी २० रुपये मोजून त्यांना प्यावे लागणारे पाणी आता त्यांना प्रशांत कोल्हे यांच्या उपक्रमामुळे मोफत उपलब्ध होत आहे.जणू त्यांनी सुरू केलेली पाणपोई ही वाटसरूंना वरदान ठरत आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here