डॉ. सत्यपाल कातकर यांच्या शिष्यवृत्ती आंदोलनाची दखल घेऊन इंजि भूषण फुसे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर यांनी केला सन्मान

0
618

डॉ. सत्यपाल कातकर यांच्या शिष्यवृत्ती आंदोलनाची दखल घेऊन इंजि भूषण फुसे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर यांनी केला सन्मान

 

 

राजुरा दिनाक १ मे २०२२ ,महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून डॉ. सत्यपाल कातकर यांनी अनुसूचित जाती ,विमुक्त भटक्या जमाती व जाती ,इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील कायमविनाअनुदानित व्यवसायिक कोर्स (इंजिनिअरींग, मेडिकल ,डीएड,बीएड,व्यवस्थापन ,कृषी ,फार्मसी इत्यादी) पुर्ण फीससह पोस्ट मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मिळावी यासाठी सत्र २००० पासून सतत पाठपुरावा व निवेदन, प्रधान सचिव ,मंत्री ,आमदार यांचेशी प्रत्यक्ष भेटी घेऊन व मुंबई ,नागपूर आदी ठिकाणी विधानसभा अधिवेशनात जाऊन आंदोलन करून महाराष्ट्र शासनाला संपुर्ण शिक्षण शुल्क व इतर फीस व मेंटेनन्ससह सर्वच फीससह शिष्यवृत्ती / फ्रिशिप देण्यास व महाराष्ट्र सरकारला शिष्यवृत्ती धोरण ठरविण्यास भाग पाडले व परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी दि.६ फेब्रुवारी २०१९ ला शासन परिपत्रक काढून समस्या सोडविली व समस्या गेल्या बावीस वर्षेपासून निरंतर सतत पाठपुरावा करून इतर मागासवर्गीय ,भटक्या जाती व जमाती व विशेष मागास प्रवर्ग करीता महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी व इतर राज्यात उच्च शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती समस्या निकालात काढण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागद्वारा दि.२५ मार्च २०२२ला शासनास परिपत्रक काढून शिष्यवृत्ती समस्या सोडविली याची नोंद घेऊन वंचित आघाडी चे जिल्हा अध्यक्ष इंजि.भूषण फुसे, शंकर पेगडपल्लीवर अखिल भारतीय मदगी समाज संघटना जिल्हा अध्यक्ष ,भगीरथ वाकडे,रमेश लिगमपलीवर, सुशील मडावी तालुका अध्यक्ष वंचित राजुरा अक्षय लोहकरे आपल्या कार्यकर्त्यांसह मनोवैज्ञानिक, शिक्षणतज्ञ, लेखक प्राचार्य डॉ. सत्यपाल कातकर यांचा त्यांचे घरी जाऊन शाल, पुष्पगुच्छ देऊन दि.१ मे २०२२ ला सत्कार केला व डॉ. सत्यपाल कातकर यांनी केलेल्या शिष्यवृत्ती आंदोलन व वर्तमान समस्येवर विस्तृत चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here